चिंताजनक : ५९५ नवे बाधित आढळले तर ६ रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव : जिल्ह्यात आज दिवभरात ५९५ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर आज ३०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. चिंतेचा विषय असा की, आज जळगाव शहरात तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आज शहरात २७५ बाधित रूग्ण आढळले आहे.

आजच्या कोरोना रिपोर्टनुसार आजवर जिल्ह्यात एकुण ६५ हजार १३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५८ हजार ८३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४ हजार ८९२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील तीन तर जामनेर आणि रावेर तालुक्यातील प्रत्येकी एक असे ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

असे आढळले रूग्ण
जळगाव शहर-२७४, जळगाव ग्रामीण- ३३, भुसावळ ५९, अमळनेर-९, चोपडा-४८, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-६, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-३६, रावेर-१४, पारोळा-१८, चाळीसगाव-८१, मुक्ताईनगर-७, बोदवड-२, आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ५९५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.