पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री ; वाचा आजचे दर

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते.

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दराने शंभरी गाठली आहे. परभणीत पेट्रोलचा दर हा 100.06 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.63 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 89.64 रुपये इतका आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली : 91.17 रुपये प्रतिलीटर

मुंबई  : 97.57 रुपये प्रतिलीटर

कोलकाता   : 91.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई  : 93.11 रुपये प्रतिलीटर

नोएडा   : 89.38 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली : 81.47 रुपये प्रतिलीटर

मुंबई  : 88.60 रुपये प्रतिलीटर

कोलकाता  : 84.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई  : 86.45 रुपये प्रतिलीटर

नोएडा  : 81.91 रुपये प्रतिलीटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.