पेटीईएम सुरु करण्याचे बहाण्याने भुसावळच्या माजी नगराध्यक्षांची फसवणूक ; 50 हजाराला गंडविले

0

भुसावळ (प्रतिनिधी )-  शहराचे माजी नगराध्यक्ष गोकुळ हुंडामल कारडा यांना पेटीईएम सुरू करण्याच्या बहाण्याने 50 हजारात भामट्याने  गंडवल्याची घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी गोकुळ कारडा यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. त्यात नमूद आहे की  कारडा  यांना मोबाईलमध्ये पे टीईएम इन्स्टॉल करावयाचे असल्याने त्यांनी अॅप इन्स्टॉल केले यानंतर 8250056179 या क्रमांकावरून कॉल आल्यानंतर संंबंधिताने आपले नाव राजेंद्र प्रसाद असल्याचे सांगत अॅनी डेस्क इन्स्टॉल करण्यास सांगून डेबिट कार्ड डिटेल्स व सीव्हीसी क्रमांक टाकण्यास सांगितला व काही वेळातच कारडा यांच्या खात्यातून 49 हजार 900 रुपये काढून  (विड्रॉल)  घेण्यात आले. कारडा यांनी संबंधीत क्रमांकावर संपर्क साधला असता दोन तासात पैसे पुन्हा परत येतील, असे उभय इसमाने सांगत फोन कट केला. मात्र पैसे परत न आल्याने कारडा यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.  झालेल्या फसवणुकी बाबत  त्यांनी बुधवारी  बाजारपेठ पोलिसात तक्रार केली .

Leave A Reply

Your email address will not be published.