वाडी संस्थानाचा वेबसाईटचा शुभारंभ

0

सद्गुरू प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न 

अमळनेर  – प्रतिपंढरपूर नगरी अमळनेर संत सखाराम महाराज वाडी संस्थांनाची एतिहासिक माहिती तसेच सामाजिक,शैक्षणिक व  धार्मिक उपक्रमांची माहिती देणारे, www.sakharammaharaj.org  हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन विद्यमान गादीपती प.पूज्य. प्रसाद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे विश्वस्त जयंत मोडक, आप्पा येवले, पत्रकार बांधव तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

खानदेशातील लोक अमळनेरला प्रतिपंढरपूर म्हणतात.  अशा या प्रतिपंढरपूरात गेल्या २०० वर्षांहून अधिक काळापासून श्री संत सखाराम महाराज वाडी मंदीर हे खानदेशातच नव्हे तर जवळ जवळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ते श्री सखाराम महाराज व त्यांच्या परंपरेतील महाराजांनी चालू ठेवलेल्या धार्मिक व भक्ति मार्गातील तत्त्वनिष्ठ कार्य पद्धतीमुळे याची महती संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. संकेतस्थळाच्या अनावरणाप्रसंगी वाडी संस्थान डिजिटल युगात मागे नाही पडू म्हणून संस्थांच्या संत परंपरेचा आढावा संकेतस्थळाच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. संकेतस्थळ लक्ष्मीकांत मिडीया यांनी तयार केले असून या संकेतस्थळावर संत सखाराम महाराजांचा जीवनालेख, त्यांचे चरित्र, त्यांचे ग्रंथ, विविध सन्मान, दुर्मीळ छायाचित्रे, संत परंपरा अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.  श्री सखाराम महाराजांपासून सुरु झालेली ही परमार्थाची गंगा त्यांच्या नंतर त्यांच्या गादीवर आलेल्या सत्पुरुषांनी वाहती ठेवली आहे. यामुळे तेथे सतत भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम सुरु असतात व म्हणूनच अमळनेरला श्री क्षेत्र अमळनेर असे म्हणले तर अतिशयोक्ती होणार नाही.

या वेळी जयंत मोडक म्हणाले, संत सखाराम महाराजांच्या व पूर्वीपासून चालत आलेली संत परंपरा आजच्या डिजिटल युगात सोशल मिडिया व वेबसाईट हे मुख्य साधन बनले आहे त्यातून ती आजच्या पिढीने लक्षात ठेवावी हा संस्थानाचा उद्देश सफल होईल. श्री सद्गुरू विठ्ठल रुख्मिणी संस्थांनाच्या माध्यमातून वर्षात धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक असे बरेच उपक्रम राबवले जातात. ते लोकांपर्यन्त व सर्व विश्वात पोहचावे या उद्देशाने संस्थानच्या या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांचे कार्य नव्या पिढीपुढे येणार हे नक्की. तसेच संस्थानचे नित्य चालणाऱ्या कार्यक्रमात सर्व भक्तांनी सहभाग घेण्यात व ऑनलाईन  देण्याची सुविधा पुरवण्यात मदत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.