हरिभाऊ जावळे यांची भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड !

0

जळगाव : माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची आज भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

आज जळगावमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपानं बाबा हरदास मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या निवडीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता. भुसावळ शहराध्यक्ष निवडीवरून हा वाद झाला होता. भाजपचे सरचिटणीस सुनील नेवे यांना मारहाण करून त्यांच्या अंगावर शाहीफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.  यानंतर बर्‍याच वेळाने ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची निवड घोषीत करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील,  आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, किशोर काळकर आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.