पुलवामा चकमकीत मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

0

जम्मू :- काश्मीरमधील पुलवामामध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात यश आले. झाकीर मुसा हा सुरुवातीला हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सक्रीय होता. यानंतर अल- कायदाशी संबंधित अन्सार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

पुलवामा येथील त्राल येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार गुरुवारी रात्री परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी झाकीर मुसाचा खात्मा केला. शुक्रवारी सकाळी झाकीर मुसाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शुक्रवारी या भागातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या १८ दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी १८ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.