राहुल गांधींकडून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

0

नवी दिल्ली :– भारतवासीयांनी देशाची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती दिली देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आम्ही आदर करतो आणि या यशासाठी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात दिली.

अकबर रोडवरील मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणाले की, भारताची जनता मालक आहे आणि या जनतेने आज आपला निकाल दिला आहे. या जनादेशाला मला कोणताही वेगळा रंग द्यायचा नाही. लोकांना वाटते की मोदी यांनी पुन्हा देशाची धुरा सांभाळावी. या मताचा मी आदर करतो’.

लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला जोरदार फटका बसला आहे. जवळपास 23 राज्यांमध्ये कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. एवढेच नव्हे तर, पारंपारिक सीट अमेठी सुध्दा कॉंग्रेसला राखता आली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.