चाळीसगाव तालुक्यातील पाणीटंचाईमुळे माहेरवाशिणींचे डोळे पाणावले

0

वाघळी गावासाठी दिले आर्थिक योगदान

चाळीसगाव :- चाळीसगाव माहेर असलेल्या लाडशाखीय वाणी समाजातील महिलांचे स्नेहसंमेलन शहरातील वाणी मंगल कार्यालय येथे संपन्न झाले. त्यात नुकतेच लग्न झालेल्या नवविवाहितेपासून तर ६० वर्षापूर्वी लग्न झालेल्या ८२ वर्षाच्या आजीबाईंपर्यतच्या चाळीसगाव हे माहेर असलेल्या ४९० महिला एकत्र आल्या होत्या. आपापल्या सासरी सुखाने संसार करत असतानाही माहेरच्या आठवणींनी अनेकींना गहीवरुन आले.

त्यावेळी माहेरवाशीण असलेल्या चाळीसगावच्या समन्वयक सौ.सरिता चितोडकर,सौ.पुष्पा पाटे,सौ.वैशाली भामरे ज्योती शिरोडे,सुनिता वाणी(पुणे), सुनिता अलई, सुहासिनी पाटील, जयश्री पाखले(ठाणे), मंदा मेतकर, चित्रा वाणी, यशोदा शिनकर, निलीमा कुडे, सुनंदा पाखले (मुंबई) रुपाली येवले, वंदना कौतकर, शोभा कौतकर, प्रमिला शिनकर(नासिक), भारती कोठावदे (पिंपळनेर) यांनी आमच्यातर्फे निश्चितच मदत करू असे आश्वासन दिले.

दरम्यान, वाघळी गावात जलसंधारणाचे काम करणाऱ्या हेमंत मालपुरे यांना लाडशाखीय वाणी समाज माहेरवाशीण (चाळीसगाव) यांचेकडून डॉ.विनोद कोतकर यांचे हस्ते ८ हजार १०० रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले. यावेळी चाळीसगाव अकौंटट असोशिएनच्या पदाधिकार्यांनी श्रमदान करताना चाळीसगाव तालुक्यात जलसंधारण मोहीम अधिक व्यापक करण्याचा संकल्प केला.

Leave A Reply

Your email address will not be published.