पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना नगरपालिकेने दिली गती

0

अमळनेर(प्रतिनिधी) : कोरोनामुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा प्रश्नांना नगरपालिकेने प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली आहे.

माजी आमदार साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या मार्गदर्शनाने नगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना गती दिली आहे.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते,जर नाले साफ असतील तर पाण्याचा योग्य निचरा होत असतो.आरोग्य सभापती शाम जयवंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण,संतोष बिऱ्हाडे प्रभारी निरीक्षक अरविंद कदम यांच्या नियोजनाखाली काम सुरू करण्यात आले आहे.यात जेसिबीच्या सहाय्याने नालेसफाई विजय पाटील व कमलेश पाटील विविध प्रभागांमध्ये राबवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.