पीपीई किट घालुन स्वँब घेणे एक अग्निदिव्यच

0

कजगाव (प्रतिनिधी)- गेल्या वर्षभरापासुन कोरोनाच्या संकटाशी शासन व प्रशासन दिवस-रात्र प्रयत्न करीत आहे.त्यात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाकाळात फ्रंट लाईन वर्कर म्हणुन कार्य करीत आहे.कोरोना म्हटले की सहा फुट नव्हे तर दहा फुट लांब राहवे लागते.आता तर ग्रामीण भागात कोरोनाने विक्राळ रुप धारण केलेले आहे.

अशा भयग्रस्त जीवघेण्या परिस्थितीत आरोग्य सेवक म्हणुन स्वँब घेतांना रुग्णांच्या नाका व तोंडाला स्पर्श करुन यमदुत ठरलेल्या कोरोनाची तपासणी करावी लागते.ही तपासणी करतांना पीपीई किट घालावे लागते.पीपीई किट घालुन स्वँब तपासणी करतांना श्वास कोंडला जातो.घामाच्या अक्षरशः घारा वाहतात.शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याचा धोका असतो.यादरम्यान हा कोरोना कधी आमच्या नरडीच्या आत प्रवेश करेल.याचा नेम नाही.तरी आम्ही तुमच्या सर्वांच्या सदृढ आरोग्यासाठी आम्ही कोरोनाशी दोन हात करीत आहोत.हे काम करणे म्हणजे एक अग्निदिव्यच आहे.असे मत गोंडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर व्यक्त केले.याबाबतीत अधिक माहीती देतांना सोनार यांनी  सांगितले की वास्तविक पाहता कोरोनाचे स्वँब तपासणी हे काम आरोग्य सेवक यांचे नाही.पण कोरोनाच्या महामारीत साथ रोगामध्ये आरोग्य सेवक म्हणुन काम करतांना आम्ही कोरोनाच्या लढाईत हे काम करुन आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत.

गेल्या वर्षभरापासुन आजवर हजारो स्वँब तपासणी केलेल्या असुन या संक्रमणाच्या संकटकाळात प्रत्येकाला मदतीची,सहानुभुतीची आवश्यकता आहे.म्हणुन मिळेल ते काम करुन आम्ही आमची जबाबदारी पार पाडण्यासाठी कटीबध्द आहोत.पीपीई किट घालुन स्वँब घेणे निश्चितच जोखमीचे काम आहे.पीपीई किट घातल्यावर होणारा त्रास हा असह्य असतो.मात्र पर्यायही नाही.ही लढाई तुम्ही आम्ही सर्वजण निश्चितच जिंकणार आहोत.त्यासाठी जोपर्यंत कोरोनाचे लसीकरण होत नाही.तोपर्यंत सर्वांनी शासकीय नियमांचे पालन केले पाहीजे.असे आवाहन सोनार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.