अमरावतीत म्यूकरमायकोसिसचा पहिला बळी ; आरोग्य यंत्रणा अलर्टं !

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावतीत म्युकरमायकोसिस चा पहिला बळी गेला आहे. 63 वर्षीय महिलेचा ब्लॅक फंगसणे बळी घेतला. कोरोना बरा झाल्यानंतर घरी परतल्यावर तिला म्युकरमायकोसिस ची लागण झाली होती .

कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली असून. कोरोना बाधितांचि संख्या व कोरोनाग्रस्त मृतांचा ही आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेचा कहर संपलेला नसतांनाच   तिसऱ्या लाटेचे ही संकेत मिळत आहे.

63 वर्षीय महिलेचा अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना वर मात करून घरी परतल्यानंतर महिलेला म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाली होती .संबंधित महिला अमरावती शहरातील साई नगर येथील रहिवासी होती.

कोरोणाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे चिंता वाढली असतानाच . म्युकरमायकोसिस चा पहिला बळी गेल्यामुळे अमरावती जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्यभरात वेगाने हातपाय पसरत असलेल्या म्युकरमायकोसिस  या बुरशीजन्य रोगाने आता अमरावती जिल्ह्यातही शिरकाव केला आहे .  म्युकरमायकोसिसचे कोव्हिड काॅंप्लिकेशन आहे. त्यामुळे रुग्णांची फुप्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी. टिबी रुग्णालय परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू केले असून .त्या ठिकाणी रुग्णांना व्यायाम ,योगा,आदि शिकवले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणमले यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.