पावसाळ्यात जिल्ह्यात 1 कोटी 7 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन

0

उपवनसंरक्षक दिगंबर पगार,जळगाव वनविभागामार्फत 40 हेक्टर तर यावल वनविभागामार्फत हेक्टरवर

नदीकाठी वृक्षलागवड करण्याचे नियोजन

जळगाव, दि. 3 –
शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत येत्या पावसाळ्यात जिल्ह्यात 1 कोटी 7 लाख 322 वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.
वन विभागातील वनरक्षक पदाची मेगाभरती आणि 33 कोटी वृक्ष लागवड योजनेबाबत माहिती देण्यासाठी श्री. पगार यांच्या दालनात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. मोराणकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा माहिती अधिकारी विलास 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे समन्वयक श्री. उदय सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी धनजय पवार आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री. पगार म्हणाले की, यावर्षी जिल्ह्यास 93 लाख 43 हजार 100 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 1 कोटी 7 लाख 322 वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून यामध्ये 47 शासकीय यंत्रणांचा सहभाग आहे.
यामध्ये जळगाव वनविभाग 13 लाख 70 हजार, यावल वनविभाग 26 लाख 69 हजार, सामाजिक वनीकरण विभाग, 20 लाख, ग्रामपंचायत विभाग 36 लाख 76 हजार 800, कृषि विभाग 4 लाख 14 हजार 300, नगरपालिका 1 लाख 21 हजार 500, महानगरपालिका 25 हजार 300, सार्वजनिक बांधकाम 21 लाख, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ 81 हजार 825, रेशीम उद्योग विभाग 6 लाख 48 हजार यासह महसुल, रेल्वे, शिक्षण, उपनिबंधक, आदिवासी विकास, पोलीस, महामार्ग व केंद्रीय संरक्षण विभागांचा समावेश आहे.
वृक्ष लागवडीसाठी लागणर्‍या लँड बँकची माहिती जमा करणेचे काम सुरु असून 17 फेब्रुवारी, 2019 पर्यंत सर्व माहिती जमा येणार आहे. तसेच लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आले असून हे काम 31 मार्च, 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्याचेही श्री. पगार यांनी सांगितले.
वृक्ष लागवडीसाठी लागणार्‍या रोपांचे नियोजन विभागामार्फत् करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव वनविभाग 22 लाख 87 हजार, यावल वनविभाग 34 66 हजार, सामाजिक वनीकरण विभाग, 56 लाख 93 हजार, रेशीम उद्योग विभाग 3 लाख याप्रमाणे 65 रोपवाटीकांमध्ये 1 कोटी 17 लाख रोपे तयार करण्यात येत आहे.
निसर्गाची धूप व पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी नदीकाठी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले असून जळगाव वनविभागामार्फत 40 हेक्टरवर, यावल वनविभागामार्फत 25 हेक्टरवर वृक्षलागवड करण्यात आहे. तसेच कृषि विभागातील बहुतांशी रोपे ही जलयुक्त् शिवार अभियानातंर्गत् खोलीकरण करण्यात आलेल्या नाल्याकाठी लावली जाणार आहेत. त्याचबरोबर जलसंपदा विभागानेही वृक्ष लागवडीसाठी 21.40 हेक्टर जागेची निवड केली आहे.
50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात लावण्यात आलेल्या जिवंत रोपांची टक्केवारी पुढीलप्रमाणे असल्याचेही श्री. पगार यांनी सांगितले.
लागवडीचे 2018 मधील जिवंत वृक्षांची संख्या टक्केवारी
2016 15,36,956 9,58,007,62.33%
2017 22,64,956 17,03,000,75.20%
2018 45,85,893 35,89,865,78.28%

Leave A Reply

Your email address will not be published.