विरवाडे येथे दोन गटात हाणामारी

0

परस्पर विरोधी तक्रारीवरून 22 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

चोपडा, दि. 3 –
तालुक्यातील विरवाडे येथे काल दि 2 रोजी दुपारी किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत लाठ्या काठ्या व दगडांचा वापर करण्यात आला.यात परस्पर विरोधी तक्रारी वरून 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत रात्री उशिरा पर्यंत कोणालाही अटक करण्यात नाही.
विरवाडे ता.चोपडा येथील वर्‍हाड 1 रोजी संध्याकाळी 5 वाजता म्हसावद ता. एरंडोल येथे गेले असता येथील नंदकिशोर बाळासाहेब पाटील व दर्शन राजेंद्र राजपूत यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. याचे पर्यावसान आज 2 रोजी दुपारी 4 वाजता विरवाडे चौकात दोन गटात हाणामारी झाली.हाणामारीत दोन्ही गटांकडून लाठ्याकाठ्या,
दगडांचा वापर आला. यात अनेकांना किरकोळ दुखापती झाल्यात. याबाबत दर्शन राजेंद्र पाटील (21) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला विशाल आत्माराम म्हाळके, किशोर धनगर, बंटी बाळासाहेब पाटील,दिलीप धनगर,रोहीत दिलीप धनगर, हरीश मनोहर बेलदार , सुनील वासुदेव कोळी, देवेंद्र फकिरा कोळी, बबलू संजय अनिल प्रकाश कोळी, विलास प्रकाश कोळी, भैया उर्फ कुवरलाल कोळी, जितेंद्र नथ्थु कोळी, व अनिल कहारु कोळी सर्व रा. विरवाडे यांचे विरुद्ध भादवि 143,147,148,149,323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सुनील पाटील करीत आहेत.
तर नंदकिशोर बाळासाहेब पाटील (वय-21) फिर्यादीवरून दर्शन राजेंद्र राजपूत, तेजस राजेंद्र राजपूत, राजेंद्र राजपूत, प्रकाश नामदेव राजपूत, भुरा नामदेव राजपूत, किर्तीराज दरबार राजपूत, कृणाल दरबार राजपूत व कालू उदयसिंग राजपूत यांच्या विरोधात भादवि कलम 143,147,148,149,323, 504, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भदाणे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.