अतिक्रमण हटावप्रश्नी भाजपच्या दोन नगरसेवकात फ्रीस्टाईल

0

चाळीसगाव शहरात उडाली एकाच खळबळ

चाळीसगाव-

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमीत टपरी काढण्याच्या कारणावरून चाळीसगाव नगरपालीकेच्या सत्ताधारी भाजपाच्या दोन नगरसेवकांमध्ये आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास फ्री स्टाईल झाल्याच्या वृत्ताने शहरभर खळबळ उडाली आहे. भाजपाचेच दोन नगरसेवक एकमेकांवर भिडल्याने शहरात चर्चेला उत आला आहे. मात्र या हाणामारीच्या घटनेचा एका नगरसेवकाने इन्कार केला तर दुसर्‍याने आपल्या प्रभागात अतिक्रमण काढतांना या नगरसेवकाने हस्तक्षेप केला. यातून हा वाद झाल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती अशी की, शहरातील स्टेशन रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 10मधील स्टेशन पोलीस चौकी ते मस्जीदपर्यत रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्याची मोहीम आज सकाळी 11च्या सुमारास नगरपालीकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू झाली.यावेळी सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक चिरागोद्दीन शेख हे उपस्थित होते. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अतिक्रमण काढले जात असतांना नगरसेवक चंद्रकांत तायडे हे तिथे आले. त्यावेळी एक टपरीचे अतिक्रमण न काढण्यावरून नगरसेवक तायडे यांनी विरोध दर्शविला असता चिरागोद्दीन यांनी त्यांना समजावले. डीपीआर योजनेनुसार हा रस्ता 14 मीटर मंजुर झाला आहे.तो 18 मिटर करायचा असेल तर रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. पालीकेकडून याबाबत दोन महिन्यापूर्वी नोटीसही बजावली आहे. त्यानुसार आज सर्व संमतीने अतिक्रमण काढले जात होते, असे नगरसेवक चिरागोद्दीन शेख यांचे म्हणणे होते. तर एका टपरीचे अतिक्रमण काढण्यावरून तायडे व शेख या दोघा नगरसेवकात बोलाचाली झाली. त्यातुन वाद झाला आणि या वादाचे रुपांतर फ्री स्टाईल हाणामारीत झाले. दोन्ही नगरसेवकांनी एकमेकांना खाली पाडल्याचीही चर्चा आहे.त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मध्यस्थी केल्यानंतर दोघांमधील वाद मिटला आणि अतिक्रमणाची मोहीम पार पाडण्यात आली.
या घटनेबाबत दोन्ही नगरसेवकांशी संपर्क साधला असता चिरागोद्दीन शेख यांनी नियमानुसार अतिक्रमण काढले जात असतांना एक टपरीचे अतिक्रमण काढू नका असे नगरसेवक तायडे यांनी सांगितले. माझ्या प्रभागातील हा प्रश्न असतांना त्यांनी येथे येवून वाद घालण्याची गरज नव्हती.बोलाचालीतून वाद वाढला असे ते म्हणाले तर नगरसेवक तायडे यांच्याशी संपर्क साधला असता वाद वगैरे काही झाला नाही. थोडीची बोलाचाली झाली. त्यात विशेष काही नाही असे त्यांनी सांगितले.
तापलेल्या वाळूत नगरसेवकांच्या वादाचा भडका
एकीकडे हिंगोणे येथील वाळू चोरी प्रकरणाने उभ्या तालु्नयाची झोप उडाली आहे.हे वाळू चोरीचे प्रकरण चांगलेच तापले असतांना त्यात नगरपालीकेच्या दोघा सत्ताधारी नगरसेवकांमधील वादाचा भडका उडाल्याने शहरात जोरदार चर्चेला उधान आले. क्षुल्लक वाद चक्क हाणामारीपर्यंत गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे पालीकेच्या सत्ताधारी गटात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.दोन्ही नगरसेवकांना सोमवती अमावस्या भोवल्याची चर्चा शहरात रंगली आहे.गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी गटात धुसफूस असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी पालीकेच्या से्नशन पंपातील घोटाळ्याप्रकरणी सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांनीआरोपांचा बार उडवून दिला होता. या प्रकरणावर अलीकडेच पडदा पडला. काही दिवसापूर्वी सत्ताधारी गटाच्या गटनेत्याची उचलबांगडी व नव्या गटनेत्याची नियुक्तीची चर्चाही जोरात रंगली होती.आता पुन्हा सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांमध्ये अतिक्रमीत टपरी काढण्यावरून वाद रंगल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.