पारोळा येथे १४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहरात कोरोना बाधीतांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे , तर दुसरी कडे मात्र आज रविवार असल्याने परंपरागत कैरी चे लोणचे टाकण्यासाठी पारोळा शहरालगत असलेल्या महामार्गावर जिवाची पर्वा न करता कैऱ्या घेण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती .

या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टन्स पाळल्याचे दिसत नव्हते तर जवळ पास ९० टक्के लोकाच्या तोंडाला मास्क सुध्दा नव्हता कि त्यांना कोरोनाची आठवण नसल्याचे दिसत होते ,तर दुसरी कडे मात्र शहरातील अनेक व्यापाऱ्या मध्ये या मुळे नाराजीचा सुर दिसत होता,प्रत्येका च्या याच भावना होत्या की शहराबाहेर कोणते ही नियम पाळले जात नाही तर धोका हा फक्त बाजारपेठे पुरताच आहे का ? असा प्रश्न उपस्थित राहात आहे . शहरातील मुख्यअधिकारी हे स्वता आपल्या गाडीच्या स्पिकर वरून वारंवार सुचना करीत होते परंतु त्याच्या या सुचनान कडे नागरीकांनी कानाडोळा करून जो तो आप आपल्या खरेदी मध्ये गुंग असल्याचे दिसुन येत होते , आज दिवस भर सोशल मिडीयावर अनेक गृप द्वारे या कैरी बाजाराची चर्चा रंगताना दिसत होती,तर दुपार नंतर हा कैरी बाजार पारोळा मुख्यअधिकारी यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने शहरातील बालाजी पार्क येथे हलवला तिथे ही कुठेच सोशल डिसंन्ट किंवा मास्क चा वापर दिसत नव्हता या मुळे बाजर पेठेत कोरोना चे धीडवडे निघाले असल्याचे पाहायला मिळाले,

पारोळा येथे १४ कोरोना बाधीत

काल रात्री उशिरा खाजगी लॅब चे अहवाल आल्याने त्यात ९ रूग्णांचे अहवाल हे पाझिटीव्ह आले. तर दुपारी २० अहवाल पैकी ५ अहवाल पुन्हा पाझिटीव्ह तर १५ अहवाल हे निगेटिव्ह आल्याची माहीती देण्यात आली.

पॉझिटीव्हअहवालात जगमोहनदास नगर १ लवन गल्ली १ तांबे नगर,१ प्रकाश टाॅकीज जवळ १मराठे गल्ली १शेवडी गल्ली १तांबे नगर १,राजीव गांधीनगर २शेवडी गल्ली २ असे पाझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले आहे. तर पारोळा तालुक्यातील १९३ बाधीत रूग्ण संख्या झाल्याची माहीती प्रांत विनय गोसावी यांनी दिली आहे,घरी रहा सुरक्षित रहा असे,प्रशासनास सहकार्य करा आहावान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.