भुसावळच्या भोळे महाविद्यालयात भारतातील पहिले राष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन उत्साहात 

0

भुसावळ (प्रतिनिधी) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय आणि एक्स्प्रेशन्स इन लँग्वेजेस एंड आर्ट फॉन्डेशन, लखनौ (यु.पी.) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील लैंग्वेजेस विभागातर्फे मराठी इंग्रजी व हिंदी या भाषा माध्यमांचे राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन कवी संमेलन उत्साहात झाले. प्रारंभी कवि संमेलनाचे राष्ट्रीय संयोजक तथा चेअरमन डॉ.संजय बाविस्कर यांनी आपल्या प्रस्तावनेत कोरोनामुळे उद्भवलेली वर्तमान परीस्थिती आणि ऑनलाइन ई-माध्यमांव्दारे नवा प्रकाश पडला यामुळेच हे राष्ट्रीय कवी संमेलन आयोजनाचे औचित्य साधले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परीषद सदस्य डॉ.आर.पी.फालक यांनी प्रसंगी मार्गदर्शन केले. तीन सत्रामध्ये विभागणी करून संमेलन झाले.

कवितांचे सादरीकरण
उद्घाटन सोहळा व मराठी कवींच्या कवितांचे काव्यवाचन या सत्रामध्ये डॉ.फुला बागुल, शिरपूर, डॉ.बबन चखाले (सासवड, पुणे) डॉ.विशाल इंगोले (बुलढाणा), डॉ.सुनील तोरणे (सांगली), डॉ.जयश्री वाघ (नाशिक) या कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या सत्राचे डॉ.संजय बाविस्कर यांनी संचालन केले. दुसर्‍या सत्राच्या प्रारंभी महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.अंजली पाटील यांनी इंग्रजी कवींचे शब्दसुमनांनी स्वागत केले. इंग्रजी कविंनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. त्यात डॉ.नरेंद्र दानी (लखनऊ), डॉ.वैजनाथ गुप्ता (उन्नाव), डॉ.मानसी महाराणा (संभलपूर, ओरीसा), डॉ.किशोर निकम (नाशिक), डॉ.शिवकुमार यादव (पटना, बिहार) या कविंनी आपल्या कविता सादर केल्या. तिसर्‍या सत्रात हिंदी कविंनी आपल्या कविता सादर केल्या.

यात डॉ.ब्रजेश लखनऊ, अरुणकुमार मिश्रा (लखनऊ), डॉ.शंभुनाथ झा (समस्तीपुर बिहार), डॉ.अरुणकुमार निशाद (सुल्लतानपुर), ऊर्दू आणि इंग्रजी कवयित्री सुश्री वसफिया हसन नक्वी या कविंनी आपल्या कविता सादर केल्या. या दोन ही सत्रामध्ये एला फॉन्डेशन सहसंयोजिका सुश्री सनाविया फरीद यांनी संचालन केले आणि आपली कविता ही सादर केली. या तीन ही सत्रांमधील मराठी हिंदी आणि इंग्रजी कवींनी आपल्या सादरीकरणातून खुमासदार शैलीत प्रेक्षकांना खिळवून ठेवत समाज वास्तव, मानवता, प्रेम, बंधूत्व तसेच आचार-विचार, व्यवहार या संबंधी मूल्यांचा पुरस्कार करीत समाजात पसरलेल्या नकारात्मक गोष्टींवर टीका करीत आपल्या कवितांचे सादरीकरण केले.
यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अंजली पाटील, डॉ.एस.डी.चौधरी, प्रा.दीपक जैसवार, डॉ.जगदीश चव्हाण, डॉ.भारती बेंडाळे तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष एवं संयोजक डॉ.संजय बाविस्कर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.