मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

0

पाचोरा (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवर ६ वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सहभागी झालेल्यांनी आप – आपल्या घरी कुटुंबासमवेत कोणतीही गर्दी न करता साजरा करण्यात आला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व रैली मित्तल आणि कुटुंबीयांनी त्यांच्या घरी योगाभ्यास केला. त्यांनी रेल्वे कर्मचा-यांना व अधिका-यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की, जागतिक स्तरावर योग हा तणाव मुक्ती म्हणुन स्विकारण्यात आला आहे. आणि सराव केल्याने सामान्य आरोग्यावर तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढीवर सकारात्मक परिणाम होतो. योगाभ्यास करण्याची कला एखाद्याचे मन, शरीर आणि आत्मा नियंत्रित करण्यात मदत करते. हा जगण्याचा एक मार्ग आहे. ज्याचा उद्देश “सशक्त शरीरात सशक्त मन” आहे.

यावर्षासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस ची थीम “घरात योगा आणि कुटूंबासह योगा” आहे. कोविड – १९ ची शृंखला तोडण्यासाठी संपुर्ण राष्ट्र कोरोना विषाणूच्या साथीच्या विरुध्द लढत आहे. म्हणून सोशल डिस्टंनसिंग राखण्यासाठी रेल्वे शक्य ती सर्व पावले उचलत आहे. योगाभ्यासाने आपल्याला तंदुरुस्त राहण्यास आणि सशक्त राष्ट्र तयार होण्यास मदत होईल. असेही मित्तल यांनी सांगितले.
मुख्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनीही त्यांच्या निवासस्थानी योगासने करून हा दिवस साजरा केला.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योगशिक्षिका शिबानी सचदेवा आणि त्यांच्या टिमने आयोजित केलेल्या ऑनलाइन योग सत्रात मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल व इतर अधिकारी सहभागी झाले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर विभागाचे सोमेश कुमार आणि मोनिका कुमार यांनी त्यांच्या घरी योगाभ्यास केला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभागाचे विवेक गुप्ता यांनी विभागीय अधिकारी व कुटुंबीयांसह रेल्वे शाळेतील शिक्षकांनी आयोजित केलेल्या आभासी योग सत्राद्वारे जोडले जाऊन योग अभ्यास केला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर विभागाचे शैलेश गुप्ता आणि प्रतिभा गुप्ता यांनी त्यांच्या घरी योगाभ्यास केला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभागाच्या रेणु शर्मा व अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपापल्या घरी योगाभ्यास केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिका-यांनी विविध पोस्ट, बॅरेक्स आणि वैयक्तिकपणे त्यांच्या निवासस्थानी योगासने केली.
मध्य रेल्वेच्या इतर अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस सोशल डीस्टनसिंगचे भान ठेवून व सर्व निकषांनुसार आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.