पारोळा तालुक्यातील माध्यमिक शाळांचा संप यशस्वी

0

पारोळा – महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी संघाचा आदेशानुसार पारोळा तालुक्यातिल माध्यमिक शाळांनी संप यशस्वी केला  महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या पुढील मागण्यासाठी हा संप करण्यात आला

ज्या शाळांना २०% अनुदान मिळत आहे त्यांना अनुदानाचा पुढचा 40%टप्पा त्वरित द्यावा,१६५६ घोषित झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना २० %अनुदानाचा टप्पा आकस्मित फंडातून ताबडतोब द्यावा,मुल्यांकन झालेल्या शाळा तातडीने घोषित कराव्यात., DCPS टप्प्याच्या अनुदानावर असलेल्या व १ नोव्हेंबर २००५ पूर्वी टप्प्याच्या अनुदानावर अथवा विनाअनुदावर होते त्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, DCPS २००५ नंतर लागलेल्यांच्या बाबतीत त्याना जुनी पेंशन योजना लागू करण्यासंबंधी केंद्र शासनाकडे शिफारस करावी,शिक्षक मंजूरीचे निकष दुरूस्त करावेत. तुकडी ही संकल्पना पूर्ववत चालू करावी. १९८० चे निकष जसेच्या तसे लागू करावेत.,

,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध पुनर्रगठीत करावा.

या संपात प्रामुख्याने एन इ एस बॉईज,गर्ल्स हायस्कूल,शिवाजी हायस्कूल,आदर्श हायस्कूल  व्ही एम जैन विदयालय,क़ेशव हायस्कूल,ज्ञानदीप हायस्कूल   बहादरपुर तामसवाडी,शेळाये,विटनेर मुंदांणे,ढोली- वेल्हाणे,चोरवड,मोरफळ,मोढांळे, टोळी,रत्नापिंप्री, आंबापिंप्री,आडगाव, माघ्यमिक शाळांचे ४५० शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होते संप यशस्वीतेसाठी मुख्याध्याफ्क संघाचे तालुकाध्यक्ष बी व्ही अमृतकर,माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष आर पी पाटील, टीडीएफ तालुकाघ्यक्ष सचिन विठ्ठलराव पाटील यांनी प्रयन्न केलेत

Leave A Reply

Your email address will not be published.