पातोंडा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

अमळनेर ;- पातोंडा ता अमळनेर येथील एका 33 वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली आहे
पातोंडा ता अमळनेर येथील रहिवासी विलास युवराज पाटील वय 33 हा आईवडिलांसोबत राहत असून शेतीत मोलमजुरी करून कुटुंब चालवीत होता काल रात्री नेहमीप्रमाणे तो जेवण करून आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला परंतु सकाळी लवकर न उठल्यामुळे घरातील त्याला उठवायला गेले असता विलास त्यांना घराच्या छतावरील लाकडी खांब्यास दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसला त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले
याबाबत गणेश धनराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.