शिक्षकाची बदली झाल्याचे एकताच विद्यार्थ्याच्या डोळ्यातून अश्रुधारा !

0

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षकाची बदली थांबविली ; चेन्नईमधील तिरुवल्लर येथील घटना

चैन्नई ;- तामिळनाडूत एका सरकारी शाळेत आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली झाल्याचं कळताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. शिक्षकाच्या बदलीचा विद्यार्थ्यांनी जोरदार विरोधही केला. परिस्थिती अशी होती की, विद्यार्थ्यांनी शिक्षकाला घेराव घालत कुठेही जाऊ दिलं नाही. ‘सर प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका’, असं हे विद्यार्थी वारंवार बोलत होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या निषेध आंदोलानंतर अखेर शाळेलाही दखल घ्यावी लागली आणि त्यांनी १० दिवसांसाठी त्या शिक्षकाची बदली थांबवली.

चेन्नईमधील तिरुवल्लर येथील ही घटना आहे. बुधवारी वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील काही विद्यार्थ्याना इंग्रजीचे शिक्षक जी भगवान यांची दुसऱ्या शाळेत बदली झाल्याची बातमी मिळाली. थोड्याच वेळात वेगवेगळ्या वर्गातील जवळपास १०० विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घातला आणि बदलीचा विरोध करण्यास सुरुवात केली.

शाळेत दोनच इंग्रजीचे शिक्षक आहेत, ज्यामधील भगवान एक आहेत. मुख्याध्यापक अरविंदन यांनी सांगितल्यानुसार, ‘भगवान सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात.

Leave A Reply

Your email address will not be published.