पाच हजाराची लाच घेतांना तहसील कार्यालयातील एकास रंगेहाथ अटक

0

जळगाव दि. 20:-
मुरूम खोदून वाहून नेण्यासाठी लागणारी फी व रॉयल्टीचे चलन राष्ट्रीयकृत बँकेत भरूनही मुरूम खोदून वाहून नेण्याच्या ऑर्डरसाठी 5000 हजाराच्या लाचेची मागणी करणार्‍या तहसील कार्यालयातील खाजगी एजंटास लाचलुचपत खात्यातील पोलिसांनी सापळा रचून लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली
लाचलुचपत पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार (नाव दिले नाही) यांनी मुरूम खोदून वाहून नेण्यासाठी लागणारी फी व रॉयल्टी राष्ट्रीयकृत बँकेत चलन भरलेले असतांनाही मुरूम वाहून नेण्याच्या ऑर्डरसाठी तहसील कार्यालयातील खाजगी एजंट निलेश गोरख पाटील याने तक्रारदाराकडे 20 मार्च रोजी 5000 रूपयाच्या लाचेची मागणी केली. प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत खात्याकडे तक्रार केल्यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीस रंगेहाथ अटक केली आहे.ही कारवाई पोलिस अधिक्षक जी. एम.ठाकूर व उपनिरीक्षक निलेश लोधी यांच्या मागदर्शनाखाली पो.हे. कॉ. अशोक अहिरे , पो.ना. मनोज जोशी,शामकांत पाटील, पो. कॉ. प्रशांत ठाकूर, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, अरूण पाटील,नासीर देशमुख ईश्वर धनगर, या ला.प्र.वि. जळगावच्या पोलिस वृदांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.