रावेर लोकसभा मतदारसंघासाठी समाज बांधणीचे समीकरण सुरु

0

आगामी लोकसभा निवडणुक जवळ आली असुन प्रत्येक संभाव्य लोकप्रतिनिधींनी आपल्यापरीने ठिकठिकाणी समाजाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून लेवा समाजाची ,मक्तेदारी मोडीत काढण्याकरिता खालोखाल रावेर चोपडा मुक्ताईनगर या पररिसरात मोठी संख्या असलेल्या गुजर समाजाने अडीच लाख मतदान असल्याचे जाहीर करीत आपला प्रतिनिधी आगामी निवडणुकीत उभा करण्याची तयारी सुरु केली असल्याची जोरदार चर्चा आहे . या मतदार संघात लेवा समाजाचे विविध पक्षांकडुन दोन ते तीन उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.संपुर्ण मतदार संघात किमान साडे चार ते पाच लाखाच्यावर लोकसंख्या लेवा पाटीदार समाजाची आहे. मात्र लेवा समाजातील अनेक कुटुंबे नोकरी व व्यवसायानिमित्त परगावासह देश विदेशात स्थायिक झाले असल्याने येवढे मतदान आगामी निवडणुकीत होईल की नाही अशीही चर्चा मतदार संघामध्ये सुरु आहे.
मात्र दलित, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाज ज्या उमेदवाराकडे मतदान करेल त्या उमेदवाराचे पारडे भारी राहील असे चित्र दिसत आहे. रिंगणातील प्रत्येक उमेदवार हा समाजाकडे आपला कल घेउन जात आहे व समाजाच्या नावावर निवडणुक जिंकण्याची तयारी करुन शक्ती प्रदर्शन दाखवले जात आहे हयासाठी 15 वर्षांपासुन लेवा समाजाचा उमेदवार रावेर लोकसभा मतदार संघातुन निवडुन येत असुन यावेळेच्या निवडणुकीत गुजर समाजानेही आपल्या समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी कंबर कसली आहे. यासाठी येणा-या निवडणुकीमध्ये कोणत्या समाजाला प्रतिनिधीत्व मिळते याकडे लक्ष वेधले आहे.
विकासाचे गळ्यात घंटा बांधणार कोण ? –
उमेदवार कोण याकडे लक्ष : समाज बांधणीचे समीकरण सुरु
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली त्यामुळे रविवार दिनांक 10 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली आहे . जनतेला विविध कामे करणार इतका निधी मंजूर. एवढ्या कोटींचे कामे करणार आदी आश्वासने देऊन तर काही ठिकाणी भूमिपूजन करून वा थातुर मातुर कामांना सुरुवात करून लोकप्रतिनिधींनी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली आहे . आता तर काय आचारसंहिता …मग काय चांग भलं .. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास .. आता ह्या विकासाच्या गळ्यात घंटा बांधणार कोण असा यक्ष प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे .
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून शहरात व तालुक्यामध्ये अनेक विकास कामे करण्यासाठी विविध ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले . तर काही ठिकाणी कामांना सुरवात करून जनतेची दिशाभूल करीत त्यांना कामे करीत असल्याबद्दल मोठं मोठी आश्वासने देण्यात आली .यासाठीच या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्याची लगबग सुरु झाली आहे . काहींनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली तर काही पक्षांनी पक्ष संघटन वाढीकरिता एखाद दोन शाखेचे उदघाटन करून हम भी किसीसे कम नही भूमिका मांडली . आधी च्या शिवाय असे म्हणत ठाम असलेले पुन्हा एकदा तुझ्याच साठी म्हणत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मिले सूर मेरा तुम्हारा ..तो सूर बने हमारा आळवू लागले आहे . कुठे लग्न , तर कुठे वाढदिवस साजरे होऊ लागले आहे . कारण कोणतेही असो शेवटी काय ? हा यक्ष प्रश्न मात्र जनतेच्या समोर आ वासून उभा आहे .पक्षातील अनेक नाराज कार्यकर्त्यांना अर्थातच पक्ष बदलूनां सुगीचे दिवस आले आहे .
. मात्र आता निवडणुकिचे बिगुल वाजल्याने प्रचंड प्रमाणावर नाराज असलेला मतदार नागरिक कोणाच्या गळ्यात माळ घालेल व पुन्हा कोण हा अपूर्ण विकास पूर्ण करणार ..अर्थात विकासाच्या गळ्यात कोण घंटा बांधणार हे मात्र येणारी वेळच सांगेल .

 

रावेर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीतर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे , कांग्रेस तर्फे माजी खा डॉ उल्हासराव पाटील , यांच्यात नक्की कोणता उमेदवार असेल याबद्दल मतदार संघात अद्यापही अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत . त्यात वृत्तपत्र व सोशल मीडियाचे माध्यमातून अनेकांच्या नावांची यादी समोर आली आहे यामध्ये कधी विद्यमान खा . रक्षा खडसे यांना पक्षाने तिकीट दिले तर कधी नाकारणार अश्या एक ना अनेक वावटळी अफवांचे पीक आले आहे .निवडणुका जाहीर होई पर्यंत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम होती . स्वबळावर निवडणूक लढवणार म्हणून मुक्ताईनगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी निडणुकीत उतरण्याकरिता जय्यत तयारीला लागले होते पण नेमके झाले भलतेच . हाता तोंडाशी आलेला घास गेला . पाच वर्ष एकमेकांना विरोध करण्यात वेळ गमावलेल्या भाजप व शिवसेनेत नुकतेच मनोमिलन झाले . दोन्ही पक्षाचे वरिष्ठ विजया करिता हातात हाथ घेऊन प्रयत्न करीत आहे . परंतु आता पक्षप्रमुखांच्या आदेशाने शिवसेना व भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या या दिलजमाईमुळे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची मात्र गोची झाली आहे . परंतु आदेश मह्त्वाचा म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल तूर्तास शांत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.