पाचोरा येथे घराचे छत कोसळल्याने वृध्द महिला ठार

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागात घराचे छत कोसळल्याने छताखाली दबून ७५ वर्षे वयाची महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली,सिंधूबाई शंकर महाले असे त्या महिलेचे नाव असुन दिनांक ३० रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घरातील मंडळी कामकाजासाठी बाहेर गेलेले असतांना अतीवृस्टीमूळे घराचे छतात पाणी शिरल्याने छत कोसळल्याचे सांगण्यात आले. वृध्द महिलेच्या छातीवर व पोटावर जबरी मार लागल्याने तीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी वर्तविला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलिस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.