राष्ट्रवादीला आणखी एक धक्का : ‘हा’ विद्यमान आमदार करणार शिवसेनेत प्रवेश

0

रायगड : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे सत्र उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरही सुरूच आहे. त्यात आता कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार सुरेश लाड हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सुरेश लाड हे सुनील तटकरे यांच्या सर्वात जवळचे सहकारी आहेत. सुनील तटकरे यांचा सख्खा पुतण्या अवधूत तटकरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता सुरेश लाड हे सुद्धा सेनेच्या संपर्कात असल्याने तटकरेंची धाकधूक वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.