पाचोरा महसूल विभागाची अवैध रेती साठ्यांवर कारवाई

0

पाचोरा:- शहरापासून काही अंतरावर असलेल्या गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा हो असल्याच्या तक्रारीवरून पाचोरा महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पाचोरा तहसिलदार कैलास चावडे, भडगाव तहसिलदार गणेश मरकड यांनी गिरड व पुनगाव – मांडकी शिवारात धडक कारवाई करून ११० ब्रास रेतीचा साठा जप्त केला. दि.१९ मार्च रोजी रात्री आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान गिरड गावाजवळील गायरान जमिनीतून रेती साठा जप्त करण्यात आला. तसेच पुनगाव – मांडकी शिवारातून ७० ब्रास रेती साठा ताब्यात घेण्यात आला आहे. महसूल विभाग तसेच पोलीस विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

नायब तहसिलदार अमित भोईटे पाचोरा रमेश देवकर भडगाव यासह मयूर आगरकर आर. डी. पाटील, बंडू आगलावे, नकुल काळकर, अविनाश लोंढे आरती शिरसाठ, गणेश गायकवाड, बहिर लांजेवार बांगर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोयगाव येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याचा अटक देखील करण्यात आली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, गजानन काळे, किरण पाटील, प्रशांत चौधरी आधी पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.