तपासणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटी : ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

तीन आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी

पाचोरा:- पाचोरा शहरात साॅ मिलची (वखारची) वार्षिक तपासणी करण्यासाठी आलेल्या जळगांव व पाचोरा येथील वन विभागाच्या पथकास दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने आठ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवुन पोलिसांनी तातळीने तीन आरोपींना अटक करून पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित संशयीत आरोपींना लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाचोरा येथील देशमुखवाडी परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रोडवरील जवाहर साॅ मिल येथे दि. २० रोजी सायंकाळी जळगांव येथील वन विभागाचे उपवन संरक्षक डिंगबर पगार, सहाय्यक वनरक्षक संजय शिवाजी मोरे व त्यांचे सोबत पाचोरा येथील वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई, वनपाल रामदास चौरे, वनरक्षक सुरेश काळे, सुनिल भिलावे हे साॅ मिलची वार्षिक तपासणी करित असतांना दरम्यान याठिकाणी जगदिश युवराज पाटील, सचिन पाटील, पंकज उर्फ भोला मोरे सह इतर पाच जण (नावे माहित नाही) दुसऱ्या दिवशी होळी असल्याने साॅ मिल मध्ये लाकडे घेण्यासाठी आले होते. मात्र यावेळी जळगांव व पाचोरा येथील पथकातील अधिकारी साॅ मिलची तपासणी करित असतांना त्यांना उद्देशुन तुम्ही येथे का आलात ? तुम्हाला वखार तपासण्याचा कोणी अधिकर दिला? असे संबोधुन वरिल तिन्ही आरोपींनी अंगावर धावुन जावुन शिवीगाळ व दमदाटी केली व रजिस्टर फाडुन त्यांचेकडे असलेला टेप ताडुन शासकीय कामात अडथळा केला.

या प्रकरणी वनरक्षक सुरेश आनंदा काळे यांनी जगदीश युवराज पाटील, सचिन पाटील, पंकज मोरे सह त्यांचे सोबत असलेल्या आठ जणांवर गुन्हा नोंदविला. पोलिसांनी जगदिश पाटील, सचिन पाटील, पंकज मोरे यांना तातडीने अटक करून दि. २१ रोजी पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीघही आरोपींना दि. २४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर उर्वरित आरोपींचा लवकर शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.