पाकिस्तानात 100 प्रवासी असलेल्या विमानाचा भीषण अपघात !

0

कराची : पाकिस्तानचं प्रवासी विमान कराचीनजिक कोसळून भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून प्रवाशांना घेऊन निघालेलं पाकिस्तान एअरलाईन्सचं (PIA) विमान  कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ लँडिंगला फक्त एक मिनिट उरले असताना ही दुर्घटना घडली.एअरबस 320 हे विमान कोसळलं आहे. यात सुमारे 100 प्रवासी असल्याचं समजलं.

div align=”left”>

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत गजबजलेल्या लोकवस्तीत विमान कोसळलं आहे. तिथे अँब्युलन्सची ये जा दिसते आहे. त्यामुळे या घटनेत मोठी हानी झाली असल्याची शक्यता आहे. अद्याप पाकिस्तानकडून अधिकृतपणे अपघातात झालेल्या नुकसानाबद्दल माहिती दिली गेलेली नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. PIA विमान अपघाताबद्दल कळलं तेव्हा धक्का बसला. आत्ता प्राधान्य लोकांना वाचवण्याच्या कामाला आहे. या घटनेची लवकरात लवकर चौकशी होईल, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.