धरणगाव नगरपालिका उपनगराध्यक्षा अंजली विसावे यांचा राजीनामा !

0

धरणगाव (प्रतिनिधी) :  येथील नगरपालिका उप नगराध्यक्षा अंजली विसावे यांनी पक्ष आदेशाने ठरल्यानुसार कार्य काळ पूर्ण झाल्यामुळे आपला राजीनामा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रमुख शिवसेना गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश आबा चौधरी यांच्याकडे सादर केला.

अंजली विसावे यांनी पाणीपुरवठा विभाग सांभाळताना गावात सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. फिल्टर पाणी जनतेला मिळावे हे स्वप्न ना. गुलाबराव पाटील यांचे मार्गद्शनाखाली, गुलाबराव वाघ लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम भाई पटेल यांचा मार्गदर्शन खाली मी पद भार घेतल्या नंतर उद्घाटन झाले, सलीम भाई यांचा निधना नंतर रिक्त झालेलं नग्राधक्ष पदाचा मान माझा सारखी एक मागासवर्गीय चर्मकार महिलेला धरणगाव चा इतिहासात मान मिळाला आणि त्या काळात विविध विकास कामे करण्यात आले.

धरणगावशहराचा इतिहासा मधे पहिल्यांदा मागासवर्गीय चर्मकार समाजाला नगराध्यक्ष पदाचा मान शिवसेना पक्षाने दिला त्या कामी शिवसेना उपनेते, ना,गुलाबराव जी पाटील ,जिल्हा प्रमुख गुलाबराव जी वाघ, गट नेते,पप्पू भावे , शहर प्रमुख राजेंद्र महाजन, पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सर्व शिवसेना नगरसेवक यांनी मोलाची साथ दिली. आणि जनता जनार्दन यांचा आशीर्वादाने दोनदा जनरल वार्ड तून शिवसेना पक्षाने उमेदवारी देऊन निवडून दिले. हा आशीर्वाद माझा साठी मोठा आहे पुढेही जनतेची सेवा कायम करीत राहणार.

माझा कारकिर्दीत लोकसभा, विधानसभा, लोकनियुक्त नगर अधक्ष यांची निवडणूक झाली पक्षाच्या आदेशाने मी प्रचार करण्यात यशस्वी झाली ,सर्वांचे आभार, जय महाराष्ट्र.

Leave A Reply

Your email address will not be published.