पहूरच्या ‘त्या ‘ तरुणावर अंत्यसंस्कार

0
पहूर, ता . जामनेर ( ता. १४ ) काल जळगावच्या कोविड  रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पहूर कसबे येथील ‘ त्या ‘ तरुणावर आज दुपारी तीनच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .
   आज सकाळी जळगांव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . त्यांचा मृतदेह घरी न आनता थेट स्मशानभूमीत नेण्यात आला . शासकीय नियमानुसार सोशल    डिस्टंसिंगचे पालन करत अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी त्यांच्या दोघ चिमुकल्या मुलांसह पत्नी, आईने एकच हंबरडा फोडला . हे ह्रदयद्रावक दृष्य पाहून उपस्थितांची मनं हेलावून गेली .
     सर्वांच्या सुख : दुःखात सहभागी होणाऱ्या या  तरूणाच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे .
       या तरुणाला श्वास घेण्याचा त्रास जाणवत होता .परंतू त्यास कोरोना सदृष्य लक्षण दिसत नव्हती . खबरदारी म्हणून त्याचे स्वॅब घेण्यात आले आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.