कोव्हिड-19 च्या अनुषंगाने सर्व्हे : तडवी संर्पक अधिकारी नियुक्त

0
  जळगाव, दि. 14 (प्रतिनिधी) – आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांचेकडील 13 मे, 2020 रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्याचा कोविड-19 च्या अनुषंगाने  नॅशनल सेरो सर्व्हे (National Sero Servey) केला जाणार आहे. याकरीता पथक दिनांक 18 ते 22 मे, 2020 दरम्यान जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्रीय पाहणी पथकासोबत येणारे अधिकारी, कर्मचारी हे जिल्ह्यात आल्यानंतर आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणेकामी व संबंधित सर्व्हे पथकाला सहकार्य करून समन्वय ठेवण्याकामी संपर्क अधिकारी म्हणसून जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर. आर. तडवी यांची नियुक्ती केली असून तसे आदेश निर्गमित केले आहे.
श्री. तडवी हे सर्व्हे करणारे पथक जिल्ह्यात आल्यापासून सर्व्हेचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संबंधितांच्या संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांबाबत समन्वय ठेवावेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास अथवा भंग केला गेल्यास सर्व संबंधित आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहतील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.