परचंडा पाटी येथे अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्या वर किनगाव पोलिसांची धाड, विदेशी दारू जप्त

0

किनगाव प्रतिनिधी : किनगाव अहमदपूर रोडवर परचंडा पाटी येथे अवैध विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती  किनगाव पोलीसांना मिळताच तेथील एका पत्र्याच्या शेडवर वीदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून ठेवले व कोरोना काळातील मा. जिल्हाधिकारी यांच्या नियमाचे उल्लंघन करुन मॅक्डॉल कंपनीच्या 15 व अन्य कंपनीच्या 180 एम एल च्या 9 अशा वेग वेगळ्या कंपनी च्या चोवीस बाटल्या आरोपी विरभदृ काशीनाथ शेरे रा. परचंडा यांच्या परचंडा पाटी वर एका टपरीवर ठेवून विक्री करण्यासाठी ठेवल्याने किनगाव पोलिसांनी अचानक धाड टाकून अंदाजे साडेचार हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली असून आरोपी पोलीसांचा सुगावा लागताच पसार झाला आहे. परचंडा हे गाव रोकडोबा देवस्थान मुळे प्रसिद्ध आहे.

या मुळे येथे कोरोना चा काळ वगळता हजारो भाविक येथे दर शनिवारी दर्शनासाठी रांगा लावतात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिक येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात होते मात्र बंद होत नाही असे ग्रामस्थांनी सांगितले मात्र आता किनगाव पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांच्या कडून श्री क्षेत्र परचंडा गावकऱ्यांकडून अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.

आरोपी विरभद्र काशीनाथ शेरे याच्या विरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापूरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गु.र. नं 127 /2021 कलम 188 भादवी व कलम 65 अ. ई. /म दा का अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास किनगाव पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.