टपाल विभागातील कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी आर्त हाक

0

भातखंडे प्रतिनिधी:-  टपाल विभागातील कर्मचारी कार्यालय वगळता पोस्टमन हे घरोघरी जाऊन आपले टपाल वाटपाचे काम करीत आहे कोरोना सारख्या महामारी च्या काळात अतिशय चोखपणे टपाल विभाग कार्यालयात कार्यालयीन कर्मचारी कार्यालयाबाहेर पोस्टमन पिग्मी एजंट आपले कर्तव्य निभावत आहे असे असताना ते लसीपासून वंचित राहत आहेत.

यामुळे त्यांचा जीव धोक्यात ते घालत आहेत कार्यालयात हजारो लोकांना त्यांना दररोज आर्थिक व्यवहार करावा लागतो त्यांच्याशी संपर्क येतो टपालाचे वाटप करताना पोस्टमन घरोघरी जात आहे शहरातील ज्या लोकांचे टपाल आहे टपाल देखील घ्यायला घाबरतात ते सांगतात कोरोना आहे सामान्य लोकांना भीती वाटते टपाल कार्यालयातील कर्मचारी तेदेखील सामान्य कर्मचारीच आहे त्यांनादेखील जीव आहे कुटुंब आहे परिवार आहे असे असताना त्यांना असुरक्षित वाटत आहे.

त्याच्यातून असुरक्षिततेची भावना त्यांच्यात निर्माण झाली असून आमचा कोणीच वाली नाही असे त्यांना वाटत आहे इतर विभागातील कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी लस देण्यासाठी सवलती दिल्या जात आहे. परंतु आमचे टपाल कार्यालयातील कर्मचारी कर्तव्य बजावत असताना लसीकरणा च्या रांगेत कसे जातील कसे उभे राहतील. हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे तरी आरोग्य विभागाने टपाल विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांची दखल घ्यावी आणि त्यांच्यासाठी विशेष लसीकरण राबवून घ्यावे असे त्यांना वाटत आहे तरी याकडे पाचोरा – भडगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील लक्ष घालावे आणि टपाल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी विशेष वेळ द्यावा व त्यांचे लसीकरण करून घ्यावे अशी मागणी कार्यालयीन कर्मचारी व पोस्टमन कर्मचारी बंधू-भगिनीं टपाल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.