सोने खरेदीताय, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

0

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजाराती तेजीचा हलकासा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसत आहे. सोने दरात आज दहा रुपयांची कपात झाली. जर आज तुम्हाला 22 कॅरेट सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तोळ्याला 44 हजार 920 रुपये तर 24 कॅरेट सोन्यासाठी 45 हजार 920 रुपये द्यावे लागतील.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचा परिणाम MCX वर दिसत आहे. MCX वर सोने दरात 136 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. आज सकाळी बाजाराच्या सुरुवातील 10.25 वाजता MCX वरील सोन्याचा तोळ्याचा भाव 47887 रुपये इतका होता.

 चांदीच्या दरात मोठी वाढ

चांदीच्या दरातही आज मोठी वाढ पाहायला मिळाली. MCX वर सकाळी 10.40 च्या सुमारास जुलै डिलिव्हरीच्या चांदी दरात 834 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचा दर 72 हजार 263 वर पोहोचला.

मे महिन्यात सोने दरात किती वाढ

डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी एमसीएक्सवरील (MCX) सोन्याचे वितरण प्रति दहा ग्रॅम 47760 रुपयांवर बंद झाले. 30 एप्रिल रोजी जून डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव (Gold Rate) 46737च्या पातळीवर बंद झाले होते. अशा प्रकारे, मे महिन्यात सोन्याच्या भावात आतापर्यंत 1023 रुपयांनी वाढ झाली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.