तळेगांव येथे 45 वर्षे वरील नागरिकांचे कोरोना लसीकरण

0

 तळेगाव प्रतिनिधी : शहरी भागात तसेच आरोग्य केंद्रांना खूप गर्दी होत असल्यामुळे मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमशंकर जमादार व तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या सूचनेनुसार आज तळेगांव येथे  ग्रामपंचायतीच्या मदतीने कोरोना लसीकरणा चे आयोजन करण्यात आले होते.ग्रामपंचायत मार्फत डेटा एन्ट्री ऑपरेटर व स्वयंसेवक व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आपल्या गावात लस मिळत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मोठ्या केंद्रावर वादीवाद अधिक प्रमाणात होत असल्यामुळे जेष्ठ नागरिक त्याठिकाणी जाणे टाळत आहे.तरी एक दोन ठिकाणी लसीकरण केंद्र ठेवण्यापेक्षा गावोगावी ज्या ग्रामपंचायतीकडे कम्प्युटर,नेट व डेटा एन्ट्री ऑपरेटर आहे अशा गावांना लसीकरण केंद्र ठेवण्याची मागणी नागरिकांकडून मोठया प्रमाणात होत आहे. प्रथमच होत असलेल्या

कोरोना लसीकरणास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत,डॉ. आश्विनी वाघ,तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही. एच माळी, आरोग्य सहाय्यीका चंद्रकला कराडे, आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी आरोग्य सेविका दुर्गा चौधरी,आरोग्य सेवक रवींद्र कपले,गटप्रवर्तक सुनयना चव्हाण, आशा स्वयंसेविका रंजना कांबळे,  अंगणवाडी सेविका गीता माळी, सरपंच आरती कोळी यांची उपस्तीती होती. यावेळी ग्रामसेवक रवींद्र तायडे व  ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर संदीप सुरवाडे,  पोलीस पाटील जयश्री सानप, गजानन कोळी सर, शांताराम जाधव व ग्रामस्थांनी  सहकार्य केले

Leave A Reply

Your email address will not be published.