जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांवर गुन्हा दाखल

0

अमळनेर (प्रतिनिधी):-कोरोनानिमित्त लागू केलेल्या आपत्ती निवारण कायद्याला न जुमानता धुळे रोडवरील हॉटेल गारवा च्या बाजूला सुरू असलेला पत्त्यांचा क्लबवर शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पत्ते खेळणाऱ्या बारा जणांना अटक केली आहे.

अटक केलेल्यांमध्ये आरोपी राकेश गुलाब महाजन, योगेश सुधाकर भदाणे, चेतन श्रीराम पवार, डिगंबर गुलाब पाटील, निशांत रवींद्र अग्रवाल,हितेश रामकृष्ण महाजन,नशिर बिस्मिल्ला पिंजारी,नयन सुधीर सोमवंशी,गणेश लोटन पवार,शैलेंद्र उत्तम महाजन, अभिषेक बाळकृष्ण महाजन, भारत प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी जुगार खेळणार्‍यांकडून चार लाख ९ हजार ५६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यात ११ मोबाईल व ६ मोटरसायकलिंचा समावेश आहे.
शहरात काही ठिकाणी पत्यांचे क्लब चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती,त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गंभिर शिंदे,सहाय्यक फौजदार संजय पाटील,हेड कॉन्स्टेबल बापू साळुंखे,शरद पाटील,योगेश महाजन,धनंजय देसले यांच्या पथकाने धाड टाकली,पुढील तपास पी.एस.आय.गंभिर शिंदे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.