पपई खाण्याचे ‘हे’ फायदे वाचल्यानंतर तुम्ही लगेचच खाण्यास सुरूवात कराल…

0

पपई हे एक असे फळ आहे जे तुम्ही सलाडमध्ये खाऊ शकता था ज्यूसच्या रूपात पिऊ शकता. इतर फळांप्रमाणेच पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.  पपई केवळ खाण्यासाठीच नाही, तर इतर अनेक कामांमध्ये उपयोगी पडते. विशेष करून पचन संबंधी औषधे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.  तर जाणून घ्या काय काय आहे खाण्याचे फायदे

 

-पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. यामुळे आपण अधिक काळासाठी तरुण दिसू शकतो. पपईमध्ये उपलब्ध असलेले क्यारोटीन हे फुफ्फुस व तोंडाच्या कॅन्सरपासूनदेखील बचाव करते.

 

-पपईच्या बिया अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध असतात, म्हणून त्या शरीरातील रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. याच बरोबर आपल्या शरीराला सामान्य सर्दी, सौम्य खोकला, सर्दी या आजारांपासून दूर ठेवतात. यात जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे आपली पाचक तंत्र आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर या बिया तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

 

-स्त्रियांच्या मासिक पाळी दरम्यान पपईच्या बिया औषध म्हणून कार्य करते. या बिया केवळ अधून मधून येणाऱ्या वेदनांपासून मुक्त देत नाहीत, तर इतर पोटदुखी वगैरेची तक्रार असल्यास पपईच्या बिया हा त्रास दूर करण्यात फायदेशीर ठरतात. यामुळे स्नायूंना खूप आराम मिळतो आणि वेदनांपासून मुक्तता मिळते.

 

-बऱ्याच लोकांना बाजारात झटपट मिळणारे पदार्थ जास्त आवडतात. म्हणून लोक फास्टफूडकडे आकर्षित होत आहेत. पण सतत व जास्त प्रमाणात फास्ट फूड खाल्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. पप मध्ये अनेक प्रकारचे एन्झाईम्स असतात. ज्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते आणि आपली पचन शक्ती वाढवण्यास मदत होते. याच्यात डाईट्री फायबर उपलब्ध असते, ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते.

– विलासराव असोदेकर

Leave A Reply

Your email address will not be published.