डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

0

जळगाव : शहरातील इच्छादेवी जवळ भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी घडलीय. तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (वय ५५, रा. आंबेडकर वसतीगृह, सिंधी कॉलनी रोड) हे रेमंडमध्ये प्रॉडक्शन विभागात नोकरीला आहेत. ते रेमंडमधील सहकार्‍यासोबत दररोज कामावर जात होते. या अनुषंगाने आज सकाळी त्यांना अक्षय विजय पाटील (३०, रा. वढोदा, ता. चोपडा; ह.मु. शिवमनगर, जळगाव) हे सहकारी त्यांना घेण्यासाठी सिंधी कॉलनी भाजीपाला मार्केट येथे आले.

 

येथून दोन्ही जळ दुचाकीने रेमंड कंपनीत जात असतांना इच्छादेवी चौकाच्या पुढे असणार्‍या सिध्दीविनायक हॉस्पीटलजवळ महामार्गावर अक्षय पाटील चालवत असलेल्या दुचाकी एमएच१९ सीसी ६७७७ क्रमांकाच्या दुचाकीला एमपी ०४ जीए ३४९२ या क्रमांकाच्या डंपरने मागून उडविले. यात दुचाकीच्या मागे बसलेले सिध्दार्थ त्र्यंबक मोरे हे जागीच ठार झाले असून अक्षय पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. मोरे यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.