तिवसा येथे पेट्रोल-डीजल- खाद्यतेल दरवाढीविरोधात सर्व राजकीय पुढारी धडकले तहसील कार्यालयावर

0

अमरावती : वाढत्या पेट्रोल डिझेल व खाद्यतेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर च्या  किमतीमुळे . सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून. त्यामुळे जनता हैराण झाली आहे . मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या परिवारांच्या घरात खाद्यतेला सह वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतीने चिंता निर्माण झाली आहे . याला भारतीय जनता पार्टी जबाबदार असून . झालेली दरवाढ ताबडतोब कमी करण्यात यावी याबाबतचे निवेदन केंद्र सरकार व राज्य सरकारला  . तहसिलदारामार्फत देण्याकरिता तिवसा येथील सर्व विविध पक्षाचे राजकीय  पुढारि  8 मार्च 2021 रोजी तहसील कचेरीवर धडकले . व विविध मागण्यांबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून पेट्रोल  डिझेल , स्वयंपाकाचा गॅस व खाद्यतेलाचे दर गगनाला भिडत असल्याचा आरोप तिवसा येथील विविध राजकीय पक्ष पुढाऱ्यांनी . पंतप्रधान यांना तिवसा तहसीलदार यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केला आहे. पेट्रोलचे दर 60  रुपये लिटर ,व डिझेल 45 रुपये लिटर आणि गॅस सिलेंडर हे 600 रुपये करण्यात यावे.  व कोरोना काळापासून संकटात असलेल्या नागरिकांची राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासना प्रमाणे वीज बिले माफ करण्यात यावे. राशन दुकानदारांना वेळापत्रक   लावण्याचे आदेश द्यावेत . अशा विविध मागण्यांना घेऊन हे निवेदन तिवसा तहसीलदार वैभव फरताळे यांना सादर केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय सुरटकर , विलास वावरे, अंबादास जुवारे, संजय गोरडे, दिलीप गोहत्रे , रंगराव गायकवाड , रामकृष्ण वाटकर, भाकपचे प्रकाश सोनवणे. चंद्रकांत वडस्कर, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.