पदाचा गर्व होऊ न देता दिन दुबळयांना मदत हाच धर्म – ना. जगवाणी

0

जळगाव दि.11-
मला विविध पदांच्या माध्यमातुन सेवा करत असतांना लाल दिवा मिळावा हे ध्येय कधीच नव्हते. दिन दुबळ्यांची सेवा करणे हाच धर्म असून दारी आलेल्याला इच्छेनुसार काहीतरी द्या, देता येत नसेल तर कटु बोल बोलून पदाचा गर्व चढु देवू नका. गरजुंना मदत करणे हाच धर्म आहे. पदे मिळत रहातील, जातील. समाजसेवा करीत असतांना माझ्या कार्याची दखल घेउन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी पालकमंत्री तथा आ. एकनाथराव खडसे, ना. गिरीष महाजन तसेच सहकारी बांधवांच्या सहकार्यातुनच आज राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे, नशीबात लिहिले असेल तर त्यास परमेश्वर देखिल थांबवू शकत नाही. असे भावोद्गार ना. गुरूमुख जगवाणी यांनी लोकलाईव्हच्या दिलखुलास मुलाखतीत बोलातांना सांगीतले.
सिंधी समाजासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या तसेच गेल्या 3 पंचवार्षिक काळात 3 माजी मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळ पाहिला आहे. कै. विलासराव देशमुख, खा. अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचेसह छगन भुजबळ, आर.आर.पाटील, अजित पवार या उपमुख्यमंत्र्यांचा कार्यकाळासह विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या समवेत हि 4 थी टर्म पार पडत आहे. यावेळी 3 वर्षासाठी सिंधी समाज अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री पद , मिळाले त्याचा उपयोग समाजसेवेसाठी करेन असा विश्वास व्यक्त केला. ना. जगवाणी यांचे गेल्या 3 पंचवार्षिक काळात राजकारणात केलेले कार्य सर्वश्रृत आहे.
फाळणीमुळे सिंधी समाजाचे नुकसान
मुळचे पाकीस्तानातील सिंध प्रांतातील मुळ रहिवासी असलेले जिवनाचा पुर्वार्ध व स्वांतत्र्यानंतर फाळणीमुळे सिंधी समाजाचे मोठे नुकसान झाले असल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. ना. जगवाणी यांचे वडील देखिल पाकिस्तानातील सिंध प्रांतातुन 5 वेळा मंत्री होते. ना. जगवाणी यांनी लाडखाना येथुन एम.बी.बी.एस हि वैद्यकिय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली. सन 1981 मधे मध्य प्रदेशातील बर्‍हाणपुर येथील खासदार शिवकुमार यांच्या कन्येशी विवाह झाला. त्याच कालावधीत मुंबई येथे भारताचे नागरीकत्व घेतले. राजकारणात माजी आ. सुरेशदादा जैन यांच्या माध्यमातुन प्रवेश झाला. सन 1995 मधे तत्कालीन अर्थमंत्री एकनाथराव खडसे, ना. गोपीनाथ मुंडे यांचेशी पहिली भेट, त्यावेळी ना. गिरीष महाजन हे सरपंच होते. आ, अरूण पाटील या सर्वांच्या समवेत भेटीनंतर सन 2004 मधे डॉ, भंगाळे, मनीष जैन, यांच्यासह अनेकांनी आमदार पदासाठी नामांकन अर्ज भरण्यासाठी आग्रह केला. परंतु आ. नाथाभाउंनी जगावाणींचा अर्ज भरून ठेवला होता. त्यावेळी जिल्हयातील पक्षातील सर्वच कार्यकत्यार्ंनी मनापासून सहकार्य केले. त्यावेळी केवळ 6 मतांनी विधान परीषद सदस्य म्हणून विजयी झालो असे त्यांनी सांगीतले. सन 2010 मधे कार्यकाळ पुर्ण झाला त्यावेळी देखिल निखिल खडसेंना उभे केले होते. त्यानंतर लागलेल्या पोटनिवडणूकीत पुन्हा विधान परीषद सदस्यपदी वर्णी लागली. व आज पुन्हा 2019 मधे आ.खडसे, ना.महाजन व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातुन सिंधी समाज अध्यक्ष राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे.
नाथाभाउंची पक्षाप्रती अपेक्षा असेल तर ते चुकीचे नाही
आ.खडसे व ना. महाजन यांच्यात मतभेद दिसून येतात परंतु प्रत्यक्षात तसे नाही,तसेच आ. खडसे हे पक्षांतर करणार यात काहीही तथ्य नाही. नाथाभाउंनी पक्षासाठी मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे त्यांची पक्षाप्रती अपेक्षा असेल तर ते चुकीचे नाही.
समाज सदस्यांची कष्ट करण्याची जिद्द
सिंघी समाज हा मुळात व्यापार उदीमाच्या माध्यमातुन कष्ट करून स्वतःचे व कुटुंबांचे पालनपोषण करणारा आहे. समाातील एकाही व्यक्तीचे नाव आतंकवाद वा वेळा प्रांतवाद यात आढळलेले नाही. सिंधी भाषेसाठी सदस्य म्हणून कार्यरत असून भाषा प्रचार प्रसारासाठी केंद्रसमितीत देखिल सदस्य म्हणून कार्यरत आहे, पक्षाने या संस्थेच्या माध्यमातुन आयएएस, आयपीएस, युपीएसी वा अन्य परीक्षार्थींसाठी मोठे योगदान दिले आहे. त्याचाच एक आदर्श म्हणजे जळगांव जिल्हयाचे पोलिस उपउधिक्षक लोहित मतानी हे एक असून ते समाजाचे प्रतिनिधीत्व करीत आहेेत.
सिंधी कौन्सिल ऑफ इंडिया चे उपाध्यक्षपदी कार्यरत असून अलायन्स प्रमाणे कार्य केले जाते. शहरातील नेत्रज्योती या डोळ्यांच्या रूग्णालय माध्यमातुन गरजु रूग्णांसाठी नेत्र शस्त्रक्रियाच नव्हेतर दोन दिवस औषधेापचार, भोजन व निवासाची मोफत सूविधा दिली जाते. या तीन वर्षांच्या कार्यकाळात गरजु रूग्णांना सर्व मदत उपचार दिले जातील असे देखिल सांगीतले.

गाळेधारकांचा प्रश्नी निर्णय सकारात्मक होणार
मनपाच्या विविध व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्नी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, व पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात विनापरतावा डिपॉझिटसह भाडेतत्वावर गाळेधारकांना देण्यात गाळयांसदर्भात स्टे देण्यात आला असून आ. खडसे यांचे कडे चर्चा केली असता याप्रश्नी नागपूर अधिवेशन काळात ठराव नुतनीकरणास मान्यता देण्यात आली आहे.सकारात्मक निर्णय देखिल लवकरच येईल व योग्य न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.