थकबाकीदारांच्या 7/12 उतार्‍यावर बोजा

0

सोमवारपासून थकबाकी वसुलीची कार्यवाही

जळगाव दि.11-
शहरातील 1 लाख बाकी असणार्‍या थकबाकीदारांना वारंवार पाठपुरावा करुनही मालमत्ता कर व पाणी पट्टी कर न भरणार्‍या मालमत्ताधारकांना जप्ती वारंट बजविण्यात येवून मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी 4 दिवसांत रक्कमा भरणा न केल्यास सबंंधित मिळकतीचे मिळकत पत्रिका व 7/12 उतार्‍यावर महानगरपालिका थकबाकी रक्कमेचा बोजा लावण्याबाबत तहसिलदार नगर भूमापन यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. सोमवारपासून शहरात व्यापक प्रमाणावर थकबाकी वसुलीची कार्यवाही करणेबाबत सर्व प्रभाग अधिकार्‍यांना निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
शहरातील मालमत्ताधारकांना मागील वर्षापर्यंतचे थकित मालमत्ता कर व पाणीपट्टी रक्कम तसेच चालू आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर व पाणीपट्टी रक्कम भरणेबाबतचे बिले देण्यात आली आहेत. 31 डिसेंबरपर्यंत भरणा करणार्‍यांना 3 टक्के सुट देण्यात आली. 31 डिसेंबर अखेर भरणा न करणार्‍या मिळकतधारकांना जप्ती वारंट बजविण्याचे काम प्रभाग कार्यालयमार्फत सुरु मालमत्ता कर पाणीपट्टी कर वसुलीसंबंधी कायदेशीर कार्यवाही करणेबाबत आयुक्तांनी शुक्रवारी बैठकीत आदेश दिले.
थकबाकीदारांची नावे चौकात लावणार
शहरातील 1 लाखाच्यावर बाकी असलेले मोठे थकबाकीदार यांची नावे होर्डिंगद्वारे महानगर पालिका कार्यालय प्रभाग कार्यालय व शहरातील प्रमुख चौकात लावण्यात येणार आहे.
अमृतची जोडणी नाही
शहरातील अमृत योजनेचे काम सुरु आहे. मोठ्या थकबाकीदारांनी थकबाकी जमा केल्याशिवाय त्यांना अमृत योजनेचे नळ कनेक्शन देण्यात येणार नसल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.