पत्रकारांच्या पेन्शनसाठी उद्या मुंबई सत्याग्रह

0

जळगाव – शासनमान्य सेवानिवृत्त पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर सन्मान मानधन मिळावी. या मागणीसाठी बुधवार दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र साप्ताहिक संघटनेच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष उमाकांत वाणी यांनी कळविले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात उमाकांत वाणी यांनी म्हटले आहे की, दोन वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्र्यांनी पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना जाहीर केली. मागील सरकारकडून तोंडाला पाने पुसली. अद्याप 25 टक्के पत्रकार त्यापासून वंचित आहेत. ठाकरे सरकारने 95 टक्के पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याची अंमलबजावणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.