महिलेचा विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस सात वर्षाची शिक्षा

0

भुसावळ (प्रतिनिधी) :महिलेचा विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, आरोपीस अतिरीक्त सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.३०) सात वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील आरोपीसह त्याची बहिण व मेहुण्यालाही न्यायालयाने शिक्षा सुनावली. मुख्य आरोपी प्रवीण भास्कर पाटील (रा. धानोरी), त्याची बहिण संगीता ज्ञानेश्वर काळे व मेहुणे ज्ञानेश्वर नथ्थू काळे (दोघे रा. हरताळे) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी शंकर मधुकर पाटील (रा. धानोरी) हे आपली पत्नी मृत कल्पना व मुलांसह गावात राहत होते. त्यांचे शेजारी त्यांचा चुलत भाऊ प्रविण भास्कर पाटील हा राहत होता. दि १३ .४ .०९ रोजी फिर्यादी हे त्यांचे शालक सोबत कुऱ्हे पानाचे या गावी गेलेले असताना, रात्री ३ .००ते ३ .३० चे सुमारास आरोपी प्रविण ने मयत ही तीचे घरात एकटी झोपलेली असताना तीचे घरात अनाधीकाराने घुसून तीची छेडखानी केली व तीचेवर अती प्रसंग करण्याचा प्रयत्न केला  व तीला धमकी सुद्धा दिली व पळून गेला. आरोपी नं २ ही आरोपी नं १ ची बहीण तसेच नं ३ हे तिचे पती आरोपी नं४ ( फरार ) ही आनं १ ची आई असुन मुसऱ्या दिवशी सकाळी मयत कल्पना व तीचे सासरे दिर इ० आ . नं . २ते ४ कडे जाऊन त्यास प्रविण यास समजाऊन सांगणे बाबत बोलले असता उलट त्यांनी मयत कल्पना हीचे चारीत्र्यावर संशय घेऊन तीला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे तीने घरातुन निघून जाऊन गावाजवळील काशिनाथ आनंदा राणे यांचे विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.

फिर्यादी हे घरी आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली असता तीचे प्रेत आढळल्या नंतर त्यांनी वरणगांव पोस्टे ला  आरोपी चुलत भाऊ प्रविण व त्यांची बहीण व मेहूणे व आई विरुद्ध त्यांनी मयत हीस विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत केल्याबद्दल तसेच इतर आरोपा खाली तक्रार दिली व त्यानुसार गु र नं ३३ / ०९ हा वरील प्रमाणे दाखल झाला.

या खटल्यामधे सरकार तेर्फ फिर्यादी सह एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले त्यात मयतचे सासरे, दिराणी तसेच गावातील व्यक्ती सह पीएम करणारे वैधकीय अधीकारी, तपासाधिकारी पी एस आय सुनील मेठे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदरच्या खटल्यात आरोपी क्र १ते ३ यांना दोषी धरण्यात येऊन त्यांना कलम ३०६ खाली ७ वर्षाच्या कैदेची शिक्षा व ५००० रू दंड तसेच दंड नं भरल्यास १ महीणा कैद तसेच आ नं १ प्रविण यास विनय भंगाचे आरोपात दोषी आढळ ल्याने त्यासाठी तीन वर्ष कारावास व ३००० रु दंड व दंड न भरल्यास २० दिवसाच्या कैदेची शिक्षा तसेच त्यास पुन्हा कलम ४४८ खाली ६ महीणे कैद व कलम ५०६ खाली ३ वर्ष कारावास व ३००० रु दंडाची शिक्षा सुनावली. सदरच्या खटल्यात सरकार तर्फ सरकारी वकील म्हणून अॅड विजय खडसे यांना कामकाज पाहीले

Leave A Reply

Your email address will not be published.