चांगल्या समाजनिर्मितीसाठी संशोधनाचा उपयोग व्हावा

0

शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद नाईक यांचे प्रतिपादननूतन मराठा महाविद्यालयात अविष्कार स्पर्धा

जळगाव – जगात भूतकाळापासून संशोधनाचा वापर होत आहे. त्या माध्यमातून मानवाने आपल्या दैनंदिन गरजा आणि भविष्यातील गरजांची पूर्तता केली आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या समाजनिर्मितीसाठी संशोधनाचा उपयोग करावाअसे प्रतिपादन पुणे येथील डीआरडीओमधील कार्यरत शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद नाईक यांनी सोमवारी येथे केले.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेच्या आयोजनाचा मान  येथील नूतन मराठा महाविद्यालयाला मिळाला असून स्पर्धेचे सोमवार३० डिसेंबर रोजी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात उद्घाटन झाले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रसाद नाईक बोलत होते.

 

सकाळी १० वा. मान्यवरांच्या हस्ते होमकुंड प्रज्ज्वलित करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ.पी.पी.पाटीलसंस्थेचे चेअरमन निलकंठ काटकरविद्यापीठ व्यवस्थापन परिषद समितीचे सदस्य प्रा.डॉ.नितीन बारीडॉ.सुभाष चौधरीडॉ. प्रिती अग्रवालप्रा.डॉ.जे.बी.नाईकडॉ.एस.के.श्रीवास्तवसमन्वयक डॉ.एस.ए.गायकवाडमहाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एल.पी देशमुखपोलीस विभागीय अधिकारी डॉ.निलाभ रोहन आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत स्मृतीचिन्ह देवून करण्यात आले.

 

स्पर्धेचे समन्वयक डॉ.एस.एस.गायकवाड यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रुपरेषा सांगून संस्थेच्या कार्याची आणि प्रगतीची सविस्तर माहिती दिली. मान्यवरांचा परिचय प्रा.गजाला शेख यांनी करुन दिला.

 

डॉ. नाईक पुढे म्हणाले कीकलाकार आपली कला सादर करतो. परंतुतो प्रत्येकवेळी नवीन प्रयोग करतो. संशोधन करताना विद्यार्थ्यांनी नवीन काय साध्य करता येईल हे बघावे. तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले संशोधन अधिक प्रभावी ठरत असते. पूर्वी संशोधनासाठी अनेक काळ लागत असे. परंतु आताच्या आधुनिक युगात माहिती सहज मिळते. याचा वापर करुन विद्यार्थ्यांनी कोणती गोष्ट योग्य किंवा अयोग्य ठरवावी. १०० वर्षांपूर्वीच्या काळी अंकगणीत कुशल संशोधनातून सोडविण्यात येत होते. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धातही संशोधनाचा उपयोग करण्यात आला होता. याच संशोधनाचा वापर करुन शास्त्रज्ञ अवकाशाची माहिती घेतातअसे सांगत त्यांनी एके-४७ या बंदुकीचे महत्त्व आणि इतिहास सांगितला. ते म्हणालेभारत देश संशोधन पद्धतीचा वापर स्वसंरक्षणासाठी करीत असून युद्धात वापरण्यात येणार्‍या अत्याधुनिक मिसाईलचा खात्माही त्याद्वारे करता येवू शकते. तसेच त्यांनी मिसाइल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलामभास्कराचार्यसिद्धार्थ शिरोमणीलिलावती आदी शास्त्रज्ञाची उदाहरणे दिली.

 

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु पी.पी.पाटील म्हणाले कीप्रत्येक विद्यार्थी संशोधनातून काही ना काही शिकत असतो. संशोधन करताना स्पर्धेकांनी समाजहित जोपासले पाहिजे. संशोधनातून अनेक गोष्टींची निर्मित्ती झाली असून याद्वारेच विद्यार्थ्यांची प्रगती होत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांची चिकित्सकवृत्ती पाहिजेअसे सांगून त्यांनी स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या.

 

 

सूत्रसंचालन डॉ. राहुल संदानशिव यांनी मराठी तर डॉ.अफाक शेख यांनी इंग्रजीतून केले. कार्यक्रमाचे आभार डॉ.अविनाश बडगुजर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्या मुख्य समितीच्या मार्गदर्शनाखाली डॉ .वाय. पी. पाटीलप्रा.आर.बी.देशमुखप्रा.पी.आर.बागुलप्रा.पी.आर.देवरेडॉ.एस.पी.मोतेडॉ.डी.आर.चव्हाणडॉ.प्रीतिष शाहडॉ.वाय पी पाटीलप्रा.एस.एम.वानखेडेडॉ.आर. बी. संदानशिवप्रा.एस.एम.वानखेडेआर.इ.पाटीलडॉ.प्रीतिष शाहडॉ. एल.पी.देशमुखप्रा.एस.एम.वानखेडेप्रा.मयुरी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील विविध समित्यांनी परिश्रम घेतले.

 

 

जिल्ह्यातील ४९ महाविद्यालयांमधील १ हजार ३२७ विद्यार्थ्यांचा सहभाग

 

स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ४९ महाविद्यालयांमधील १ हजार ३२७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात स्पर्धकांनी १०२ मॉडेल व ६१५ पोस्टर सादरीकरण केले. ही स्पर्धा पदवीपदव्युत्तरपदवी व शिक्षक अशा चार विभागात झाली. पोस्टरमॉडेलव्दारे विद्यार्थी आपल्या संशोधनाचा विषय मराठीहिंदी व इंग्रजी या भाषेत उपस्थितांसमोर सादर केले. या स्पर्धेत सहा गट तयार करण्यात आले होते. त्यात पहिल्या गटात सामाजीकशास्त्रेभाषामानव्यविद्याललित कलादुसर्‍या गटात वाणिज्यव्यवस्थापन आणि विधीतिसर्‍या गटात विज्ञान शाखात्यात भौतिक शास्त्रजीवन शास्त्रगणितपर्यावरणशास्त्रगृह आणि संगणकशास्त्र आहेत. चौथ्या गटात कृषी व पशुसंवर्धनपाचव्या गटात अभियांत्रिकी व तंत्रज्ञानसहाव्या गटात औषधनिर्माण शास्त्र यांचा समावेश होता.

 

स्पर्धेकांनी दिली विविध विषयांवर माहिती

 

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातील आपला विषय परीक्षकांना सांगितला. यावेळी शेतीसाठी जेनेरिक औषध निर्मिती कशी करता येतेमोबाईलद्वारे शेतात पाणी आणि इतर कार्यमंदिर व धार्मिक स्थळांना कमी वेळात दर्शन कसे घेता येईल तसेच इलेक्ट्रानिक स्वयंचलित व्हील चेअर यासारख्या अनेक विषयांवर स्पर्धकांनी मॉडेल तयार केले होते. तसेच पोस्टर प्रदर्शनातून कलम-३७०सोशल माध्यमाचा अतिवापरस्त्री-भृणहत्या,  बालमजुरीसामाजिक बदलस्त्री-पुरुष भेदभावअहिराणी भाषेचे महत्त्व आदी ज्वलंत विषयावरही सविस्तर संशोधनात्मक माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.