पाचोऱ्यात दि. २ जानेवारीपासून राज्यस्तरीय खुल्या बास्केट बॉल स्पर्धा

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  येथील शेठ मुरलीधजी मानसिंगका महाविद्यालयाच्या प्रांगणात पाचोरा बास्केट बॉल गृपतर्फे स्व. नितीन मराठे, स्व. अजय गौड, स्व. दिपक शहापुरे यांचे स्मरणार्थ खुल्या राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २ जानेवारी सायंकाळी ७ वाजता स्पर्धेस सुरुवात होणार असुन या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे भारताच्या बास्केट बॉल संघाचे माजी कर्णधार संभाजी कदम यांची उपस्थिती असणार आहे. या खुल्या राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेसाठी मुंबई पोलिस, मस्तान (मुंबई), नाशिक पोलिस, पुणे आर्मी, औरंगाबाद, नागपुर बाॅईज, इंदौर, एस.आर.पी. पुणे, जबलपुर, रतलाम, अमरावती, जळगांव पोलिस, धुळे बाॅईज व पाचोरा या संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजयी संघास ३१ हजार रुपये रोख व चषक, द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये रोख व चषक, तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये रोख व चषक, चतुर्थ पारितोषिक ५ हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.  स्पर्धा यशस्वीतेसाठी येथील दिपक (आबा) पाटील, सचिन भोसले, विकास सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, सुशांत जाधव, जावेद बागवान, तुषार बिऱ्हाडे, संदिप मराठे, अल्पेश कुमावत, राहुल शिंपी, ललीत बिरारी, महेश कोळी, निलेश पाटील सह पाचोरा बास्केट बॉल गृपचे सदस्य हे परिश्रम घेत आहे. या बास्केट बॉल सामन्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही आयोजकांकडुन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.