पडत्या काळात सेनेची साथ ;-छगन भुजबळ

0

भुजबळ राजकारणात होणार सक्रिय ; महाराष्ट्रासह संपूर्ण देशात फिरणार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून घरी येताच भुजबळ यांनी घरी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचं सांगितलं. रुग्णालयातील सर्व तपासण्यापूर्ण झाल्यावर नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात फिरणार असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांचा सर्वात पहिला फोन आला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या नावाखाली मला तुरुंगात टाकण्यात आलं. त्या महाराष्ट्र सदनचा सर्वचजण लाभ घेत आहेत. त्याचा मला आनंदच आहे. भाजपच्या खासदारानेही ‘महाराष्ट सदन सुंदर और बनानेवाला अंदर’, अशी प्रतिक्रिया देऊन कामाला दाद दिली होती, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. तुरुंगातील अनुभव कसा होता असे विचारल्यानंतर भुजबळ मिश्किलपणे हसत म्हणाले की, ‘ज्यावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ असे उत्तर दिले. महाराष्ट्र सदनबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले की, ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपात मला तुरुंगवास झाला, आज त्याच महाराष्ट्र सदनाचा सर्वजण लाभ घेत आहेत, देशात या सदनाचा लौकीक आहे.
—दोन वर्षांपासून भुजबळ तुरुंगवासात होते-
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून भुजबळ तुरुंगवासात होते. 4 मे रोजी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.