जिल्ह्याबाहेरील महिला संस्थांना अचानक दिला ठेका!-भाग -२

0

संशयाची सुई अधिकार्‍यांवरच : गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

जि.पने दिले कारवाईचे पत्र
सभेत झाली जोरदार चर्चा

जळगाव, दि. 9 –
पाचोरा तालुक्यातल अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवयांचे होणारे वितरण लक्षात आल्यानंतर घरपोच पोषण आहाराचे धिंडवडे निघाले असून हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांच्या अंगाशी येणार आहे. जळगावातील स्थानिक पदाधिकार्‍याने यात पुढाकार घेवून हा मक्ता एकाच महिला गृहउद्योगाला दिल्याने या प्रकरणात गोडबंगाल असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. हे प्रकरण दडपण्यासाठी आता लोकप्रतिनिधी सरसावले असले तरी बालकांच्या जीवाशी सुरु केलेला खेळ चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत.
अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरविण्यासाठी पूर्वी तीन-चार बचत गट वा गृहउद्योगांना मक्ता दिला जात असे, यात स्थानिक बचत गटांना प्राधान्य असताना देखील पदाधिकार्‍यांनी मनमानी पद्धतीने हा मक्ता धुळे येथील एका भाजपा पदाधिकार्‍याच्या गृउद्योगाला दिल्याने दाल मे काला है अशी शंका निर्माण होवू लागली आहे. दरम्यान पाचोरा पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत जि. प. प्रशासनाने पत्र देवूनही पोलिसांनी तांत्रिक अडचण दाखविल्याने या शंकेला बळ मिळाले आहे.

एकाच बचत गटाकडे ठेका
शालेय पोषण आहार,घरपोच पोषण आहार ह्या योजना राबविताना स्थानिक बचत गटांना मक्ता देणे बंधणकारक असतानाही काही अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी मिलीभगत करीत हा ठेका चक्क धुळे येथील मक्तेदाराला दिला असून हा मक्तेदार सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष केंद्रीत करणे क्रमप्राप्त झाले आहे. गतकाळात तीन-चार बचत गटांकडे हे काम विभागून देण्यात येत असताना अचानकपणे हे काम एकाच ठेकेदाराला कसे दिले असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील अंगणवाडीमध्ये या बुरशीयुक्त शेवायांची 36 पाकिटे आढळली होती. याबाबतची तक्रार काही पाकिटांसह शिवसेनेने स्थायी समितीच्या बैठकीत दि. 3 मे रोजी केली होती. यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दि. 4 मे रोजी पाचोरा तालुका महिला व बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्रही पोलिसांना दिले मात्र माल खराब आला व तो संबंधित ठेकेदाराने बदलून दिला. यात कोणासही हानी झाली नाही की, नुकसान झाले नाही. यामुळे गुन्हा दाखल कसा करायचा? असा प्रश्‍न पोलिसांना पडला असल्याचे जि. प. कडून सांगण्यात आले असले तरी हे सारे गोलमाल उत्तरे केवळ ठेकेदाराला वाचविण्यासाठी सुरु आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.