झाडू पार्टी ड्रग्सची होलसेलर ! 

पंतप्रधान मोदींचा ‘आप’ वर निशाणा

0

जालंधर, लोकशाही न्युज नेटवर्क 

ज्यांनी एवढा मोठा दारू घोटाळा केला आहे, ते पंजाबमधील ड्रग्जच्या काळ्या पैशात कसे बुडवणार नाहीत. झाडू पार्टी ड्रग्सची होलसेलर असून, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मालकाचे आदेश घेण्यासाठी तिहार जेलमध्ये जावे लागते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टीवर जोरदार निशाणा साधला. “पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया आणि शूटर्स गँग यांचे राज्य सुरु आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान हे फक्त कागदोपत्री मुख्यमंत्री आहेत. बाकी त्यांना पंजाबच्या परिस्थितीशी काही घेणेदेणे नाही. सगळे मंत्री मजा-मस्ती करत आहेत. अशा परिस्थितीत पंजाबचा विकास कसा होईल? सध्याचे पंजाबमधले भगवंत मान सरकार हे भ्रष्ट सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्या दिवशी पंजाब दौऱ्यावर राहिले. सर्वप्रथम त्यांनी गुरुदासपूरमध्ये सभा घेतली. यानंतर त्यांनी जालंधरमध्ये एका सभेला संबोधित केले. पंजाबमध्ये इंडिया आघाडीचे लोक एकमेकांना शिव्या देतात. त्यामुळे यापैकी एकालाही मतदान करणे म्हणजे पंजाबच्या विरोधात मतदान करणे होय.

पंजाब आमचा विश्वास, पंजाबची प्रगती ही मोदींची हमी. पंजाबमध्ये उद्योगाला चालना मिळावी, पंजाबमधील लोकांना घरपोच काम मिळावे, असा आमचा संकल्प आहे. त्यामुळे आम्ही विकासाचे काम करत आहोत. आज जालंधरलाही वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. जालंधर आणि फिल्लौर रेल्वे स्थानके विकसित होत आहेत, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

“मी जर 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले. त्यावेळी मी जर पंतप्रधान असतो तर आत्मसमर्पण करणाऱ्या 90 हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडवले असते. तसेच पाकिस्तानकडून कर्तारपूर साहेब परत घेतले असते.” असे नरेंद्र मोदी यांनी दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करतारपूर साहेब गुरुद्वाऱ्याचा भावनात्मक मुद्दा उपस्थित केला. देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार आहे असेही ते म्हणाले. देशाची फाळणी झाली तेव्हा करतारपूर साहेब पाकिस्तानमध्ये जो पंजाब प्रांत केला त्यात गेला. करतारपूर साहेब गुरुद्वारा भारताच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर आहे, असे ते यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.