वधूवरांना कचराकुंडी भेट देऊन स्वच्छतेचा अनोखा संदेश

0

भडगाव नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम ; अनेक जोडप्याना दिली स्वच्छतेची शपथ

भडगाव :– नगरपालिकेच्या वतीने शहरातील विवाह झालेल्या वधूवरांना कचरा कुंड्या भेट म्हणून देण्यात आल्या. स्वच्छता अभियान मोहिमेची जनजागृती व्हावी. व नवदाम्पत्याची पुढील आयुष्याची सुरुवात ही “मी स्वच्छता राखेल ” ही शपथ घेऊन व्हावी. हा हेतू ठेऊन पालिकेच्या वतीने  त्यांना ओला व सुखा कचरा संकलन कुंड्या देण्यात आल्या. भडगाव पालिकेच्यावतिने ही योजना राबविण्यात आली . शहरातील सर्व लग्नांना भेट देऊन दोन कुंड्या देण्यात आल्या.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, नितीन पाटील,छोटू वैद्य व सहकाऱ्यांनी मुस्लिम नवदाम्पत्याला घरी जाऊन कुंड्या दिल्या. यानंतर पालिकेचे कर्मचारी सुभाष अहिरे यांच्या दोन कन्याच्या लग्नात या कुंड्या दोघे विवाहित जोडप्याला भेट देण्यात आल्या. तर लक्ष्मण भाऊ मंगलकार्यालयात पत्रकार  संजय पवार यांची कन्या गायत्री व निलेश यांच्या विवाह सोहळ्यात भेट देऊन नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी राहुल पाटील , नगरसेवक अमोल नाना पाटील , नगरसेविका योजना पाटील, यांनी पालिकेच्यावतीने ओला व सुखा कचरा कुंडी भेट दिली . यावेळी श्री साई समर्थ संस्थेचे चेअरमन भय्यासाहेब पाटील, लाडकूबाई शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे , प्रदीप महाजन, संजय शिंदे, संजय पवार आदी उपस्थित होते.

पालिकेने राबविलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. शिवाय विवाह सोहळ्यात आलेल्या लोकांना हा उपक्रम मोठ्या उत्साहाचा ठरला,  सर्व ठिकाणी लग्ना नंतर विवाह समारंभात आलेल्या लोकांनी विवाह नंतर स्वच्छता मोहीम राबविली व कार्यालय आदी परिसरात स्वच्छता केली.

Leave A Reply

Your email address will not be published.