पाटील कुटुंबीय निघालयं भारत भ्रमंतीला .. !

1

६५ दिवसांमध्ये पूर्ण करणार भारत परिक्रमा ; १८ हजार कि. मी. चा होईल प्रवास

जळगाव;- सुट्टीच्या दिवसांमध्ये अथवा काही सणोत्सवानिमित्त धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग् येतो . मात्र फिरण्याची व देवस्थळांचे दर्शन घेण्याची आवड असल्याने १३ मे पासून भारत परिक्रमा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सौ. संध्या किशोर पाटील या दांपत्याने आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली . संपूर्ण भारताच्या धार्मिक स्थळांसह चार धामांचे दर्शन घेण्यासह भारतातील सुमारे १८ हजार कि.मी. हा प्रवास राहणार असून पाटील दाम्पत्यासह त्यांचा १४ वर्षीय वास्तव हा मुलगा सोबत असणार आहे . त्याची सुरुवात कुलदेवता वणीची देवी सप्तशृंगी व पालीचा गणपती यांचे दर्शन घेऊन होणार आहे .
डीजेचा व्यवसाय असलेले किशोर पाटील व ऍडव्होकेट असलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ . संध्या पाटील आणि मुलगा वास्तव या तिघांनी वेगवेगळी थीम डोळ्यासमोर ठेऊन भारत परिक्रमा करण्याचे नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून केले होते . अर्थात कुटुंबियातील इतर सदस्यांना या प्रवासाची जाणीव होऊ दिली नव्हती . मात्र सासरे यांनी होकार दिला अन मग मित्रांचीही साथ मिळाल्याने हुरुप वाढून या संकल्पना प्रत्यक्षात आणावी यासाठी नियोजन केले . येत्या रविवारी १३ मे रोजी या प्रवासाला सुरुवात होणार असल्याची माहिती संध्या पाटील यांनी  पत्रकारांशी बोलताना दिली . किशोर पाटील यांनी जल है तो कल है , संध्या पाटील यांनी झाडे लावा झाडे जगवा आणि चिमुकला वास्तव याने आम्ही सर्व भारतीय एक आहोत हि थीम डोळ्यासमोर ठेऊन याप्रवासाचे शिव धनुष्य पेलले आहे . प्रवासात किशोर पाटील हे स्वतः कार चालविणार आहेत . त्यांना याचा प्रदीर्घ अनुभव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

———-अशी राहील भारत परिक्रमा ——–
१३ मे रोजी सप्तश्रुंगी माता आणि पालीच्या गणपतीचे दर्शन घेऊन कोकण , पणजी, रामेश्वरम, तिरुपती,जगन्नाथ ,कांचीपुरम,झारखंड ,बिहार उत्तरप्रदेश भारतमातेचे मंदिर, सिलिगुडी,ऋषिकेश,गंगासागर,आग्रा , दिल्ली , केदारनाथ,लेह लद्दाख , अमृतसर,पंजाब ,राजस्र्थन,कच्छ गुजरात ,सोरटी सोमनाथ , परत पाली असा हा १६ हजार किलोमीटरचा प्रवास राहणार आहे . दरम्यान कुटुंबियांसह भारत परिक्रमा करताना या प्रवासाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनीज बुकमध्ये होण्याची शक्यता पाटील दाम्पत्याने बोलून दाखविली आहे . त्यांच्या या प्रवासाला मित्र परिवाराचे पाठबळ लाभत आहे . अनेकांनी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

1 Comment
  1. Kishor patil says

    Thanks

Leave A Reply

Your email address will not be published.