पक्षांतर्गत राजकारणावरून भाजपची आजची बैठक वादळी ठरणार

0

जळगाव : आज पाडापाडीच्या पक्षांतर्गत राजकारणावरून भाजपची जळगावात उत्तर महाराष्ट्राची बैठक बाेलविण्यात अाली अाहे.  या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार अाहेत. दरम्यान आजची ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता अाहे.

रावेर लाेकसभा मतदारसंघात मुक्ताईनगर, रावेर अाणि मलकापूर तर जळगाव लाेकसभा मतदारसंघात अमळनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले अाहेत. या सर्वच ठिकाणी पक्षांतर्गत कुरघाेड्या अाणि पक्ष कार्यकर्त्यंानी िवराेधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात अाला अाहे. रोहिणी खडसेंचा पराभव हा काही पक्षातील अंतर्गत लोकांमुळे झाल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केला होता.  अशा लोकांची तक्रार  प्रदेशाध्यक्षांकडे करणार असल्याचं त्यांनी म्हटले होते.  या तक्रारीच्या अनुशंगाने माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील खडसेंना थेट नावे जाहीर करण्याचे अाव्हान दिले अाहे. त्यामुळे स्थानिक नेते या बैठकीत काेणती भूमिका घेतात याबाबत उत्सुकता अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.